लॉकडाउनने कुटुंबातील दुरावा आणखी वाढला

The lock down further aggravated family distress
The lock down further aggravated family distress
Updated on

इचलकरंजी : छोटीशी मुलगी गावाकडे तर आई वडील पुणे मुंबईत, पत्नी बेंगलोरमध्ये तर पती अन्य शहरात, सहज म्हणून गावाकडे गेलेले कुटुंबीय आणि त्यातून झालेली ताटातुट असे चित्र अनेक कुटुंबात पहावयास मिळत आहे. 14 तारखेला लॉकडाउन संपणार आणि हा नात्यातील दुरावा दूर होणार अशी आशा बाळगलेल्या अनेक कुटुंबियांना पुन्हा लॉकडाउन जाहीर झाल्याने धास्ती बसली आहे. 

मनाची समजूत काढत एकमेकांपासून लांब राहिलेल्या अनेकांना भेटण्याच्या ओढीने जीव कासावीस होत असल्याचे चित्र काल सायंकाळपासून पहावयास मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढताना शाळांना सुट्टी पडली. त्यामुळे कुटुंबातील काहीजण मुलांना घेऊन दुसर्‍या गावी गेले. आई वडील एका ठिकाणी तर मुलं दुसर्‍याच ठिकाणी असे चित्र निर्माण झाले. लॉकडाउनची पुसटशी कल्पनाही फारशी मनात आली नाही. अचानक लॉकडाउन जाहीर झाले आणि जाण्या येण्याची सर्व साधने ठप्प झाली. पर्यायच नसल्यामुळे 14 एप्रिलपर्यंत आपण असेच राहायचे अशीच मानसिकता कुटुंबातील अनेक व्यक्तींनी केली. येत्या दोन तीन दिवसात आपल्यापासून दूर असलेली माणसे जवळ येतील, आपण आपल्या मुळ गावी परतू, आपण आपल्या स्थायिक झालेल्या ठिकाणी जाऊ अशी अनेकांची धारणा होती. मात्र काल सायंकाळी पाच वाजता राज्यात पुन्हा 15 दिवसासाठी लॉकडाउन जाहीर झाले आणि अनेकांनी पाहिलेल्या स्वप्नावर विरजण पडले. 

काही कुटुंबाची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. पती एका ठिकाणी, पत्नी एका ठिकाणी तर मुले एका ठिकाणी असे चित्र आहे. जे मोठ्या शहरात अडकले आहेत त्यांचे खाण्याच्या बाबतीत अत्यंत गैरसोय होत आहे. इतर संकटाच्यावेळी शेजार्‍याकडून काहीतरी दिलासा मिळत होता. मात्र कोरोनाच्या संसर्गाने सगळ्यांचीच दारे एकमेकासाठी बंद झाली आहेत. येत्या दोन दिवसात लॉकडाउन संपेल आणि शिथीलता येऊन आपण आपल्या इच्छित ठिकाणी जावू असे स्वप्न बाळगलेल्या अनेकांना आता धक्का बसला आहे.

कोरोनाच्या लढ्यामध्ये सर्वचजण तयारीने उतरले आहेत. मात्र कुटुंबातील अनेक सदस्यांपासून गेले तीन आठवडे लांब राहिलेल्यांना पुन्हा 15 दिवसाचा कालावधी वर्षागणिक वाटू लागला आहे.

माझी छोटी मुलगी सांगली जिल्ह्यातील एका गावात आहे. आई कोल्हापूर जिल्ह्यात तर मी पुण्यात एकटीच राहत आहे. मुलीला सुट्टी पडली म्हणून पाहुण्याकडे पाठविले. एवढे दिवस कसेतरी मुलीला धीर दिला. आता मात्र कुटुंबातील हा विभक्तपणा आम्हाला असह्य होत आहे.

-अर्चना पाटील, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com