
कोल्हापूर - जिल्ह्यातील लॉकडाऊन पुन्हा 31 ऑगस्टच्या रात्री बारापर्यंत वाढविले आहे. यामध्ये जिल्हा बंदी कायम ठेवली आहे. या कालावधीत आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा, सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हांतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधित असेल, असा आदेश आज जिल्हाधिकार दौलत देसाई यांनी सायंकाळी प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी केलेल्या जाहीरनाम्याची मुदत 31 जुलैला संपत असल्यामुळे पुढील आदेश आज प्रसिद्ध केला आहे.
नव्या लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेज, शैक्षणिक-प्रशिक्षण- शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी बंदच असतील. एमएचएने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त अंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंदच राहिल. मेट्रो आणि इतर रेल्वे सुद्धा बंद असतील. देशांतर्गत होणारी हवाई प्रवासी वाहतूक स्वतंत्र आदेशाद्वारे आणि एसओपी नुसार परवानगी घेतलेले वगळून बंद असेल. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, असेंम्बली हॉल, यासारखी तत्सम ठिकाणांवर बंदी असेल. सर्व सामाजिक-राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळाव्यांनासुद्धा बंदी कायम ठेवली आहे. धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणची उपासना स्थळे बंदच असतील. सर्व प्रकारचे बंदीस्त हॉल किंवा खोलीतील खेळ जिमनॅशियम इ. यांचीही बंदी कायम ठेवली आहे.
जीवनावश्यक वस्तू व आरोग्य कारणे वगळून 65 वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व दहा वर्षाखालील मुले यांना घराबाहेर पडण्याला बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक सेवा वगळून सर्व मार्केट व दुकाने सकाळी नऊ पूर्वी व सायंकाळी सातनंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश ही देण्यात येतील.
सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू,सुपारी खाणे व थूंकणे यांनाही बंदी आहे. कंटेन्मेंट क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसदर्भातील कार्याला परवानगी दिली असल्याचेही आदेशात म्हटले आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणांसाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णतः बंदी असेल. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.