Video : तुम्हाला घरच्या घरी निर्माल्यापासून खत बनवायचे आहे तर मग ही बातमी वाचाच

made by Fertilizer from Nirmalya see news and video information for smita patil from kolhapur
made by Fertilizer from Nirmalya see news and video information for smita patil from kolhapur

कोल्हापूर : गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माल्य साठते. घरातील गौरी गणपती विसर्जन दिवशी मूर्तींसोबतच निर्माल्याचेही नदी, विहिरीत अनेकजण विसर्जन करतात. त्यामुळे जल प्रदूषणात भर पडते. हे प्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरी निर्माल्यापासून खतनिर्मितीचा पर्याय समोर आला आहे. वेळ, पैसे वाचविणाऱ्या या पर्यायातून घराच्या बागेतल्या झाडांना नवसंजीवनीही देऊ शकतो. असेच विविध प्रयोग पर्यावरणप्रेमींकडून होऊ लागले आहेत. 

श्री. गणेशाचे पूजन केल्यानंतर दुर्वा, जास्वंदी, झेंडूची फुले, हार, खाऊचे पान यासह इतर वनस्पतींचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होते. विसर्जनादिवशी निर्माल्य दान करतात. या निर्माल्यापासून महापालिकेतर्फे खतनिर्मिती केली जाते. या निर्माल्यावर घरच्या घरी प्रक्रिया करता येऊ शकते. या प्रयोगाची बहुतेकांना माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात हे सेंद्रीय खत कसे करायचे, याची माहिती उपलब्ध होत नाही. अशाच निर्माल्यापासून खतनिर्मितीचे प्रबोधन गार्डन्स क्‍लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या स्मिता पाटील करत आहेत. 

तुम्हीही करू शकता...
प्लािस्टकची कुंडी, रंगाचा डबा किंवा मातीच्या कुंडीला छिद्र पाडायचे. कुंडीत सुरवातीला विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या घालायच्या. त्यावर  वाळलेली पाने घालायची. त्याचा एक थर दिल्यानंतर गणेशोत्सवात साठलेल्या निर्माल्याचा एक थर द्या. हे निर्माल्य घालण्यापूर्वी ते वेगवेगळे करून घ्या. उदा. फुलांच्या पाकळ्या काढून घ्या. या थरानंतर मातीचा एक थर द्या. त्यानंतर पुन्हा निर्माल्याचा थर द्यायचा. जोपर्यंत निर्माल्य संपत नाही तोपर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी. कुंडीत हे घालून झाल्यानंतर थोडेसे पाणी शिंपडावे. त्यानंतर ही कुंडी झाकून ठेवा. फक्त आठ ते पंधरा दिवसांनंतर हे मिश्रण हलवायचे. 


गार्डन्स क्‍लबतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबत निर्माल्यापासून खतनिर्मितीचे प्रबोधन करत आहोत. घरच्या घरी निर्माल्यापासून चांगल्या प्रतीची खतनिर्मिती करता येते. एक ते दीड महिन्यात ही खतनिर्मिती होते. 
- स्मिता पाटील

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com