कोल्हापुरात अशी आहे 9999 नंबरची जादू

This is the magic number 9999 in Kolhapur
This is the magic number 9999 in Kolhapur

व्ही. बी. पाटील यांची उद्योजक म्हणून ओळख. कोल्हापूर लगतच शिंगणापूर त्यांच गाव. साकोलीकॉर्नर येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे ते विद्यार्थी. त्यांच्या कुटुंबाचे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. पाटील यांनी पदवी मिळवल्यानंतर महापालिकेच्या रस्त्यांची छोटी कंत्राटे घेण्याचा श्रीगणेशा केला. त्यांच्या आयुष्यात 9999 महत्त्वपूर्ण ठरला. पहिल्या गाडीचा तो क्रमांक होता. यशस्वी उद्योजक झाल्यावर नव्या गाड्या त्यांच्या अंगणात आल्या. त्यांच्या नंबर प्लेटवर 9999 हाच नंबर घेतला गेला आणि त्यावर "व्हीआयपी'चा शिक्का बसला. 

पाटील कुटुंबीयांचा आकार मोठा असल्याने शेतीवर सर्वांची गुजराण अवघड होती. मुलांच्या शिक्षणात मात्र कुठेच तडजोड झाली नाही. व्ही. बी. पाटील यांचे थोरले भाऊ जे. बी. पाटील एमएस्सी झाले. शिवाजी विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागात ते प्राध्यापक होते. 
पांडुरंग पाटील शेती व्यवसायात, तर एम. बी. पाटील मायनिंगच्या व्यवसायात रमले. व्ही. बी. पाटील यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महापालिकेची रस्त्यांची कामे मिळवली. त्यांची ही वेगळी वाट कुटुंबीयांच्या पसंतीची ठरली. 1985 रोजी पाटील यांनी फियाट खरेदी केली. तिचा नंबर एमझेडजी 9999 होता. नंबरातील सर्व अंकांची नऊ बेरीज पाटील यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. "लकी' नंबर म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्यांनी 1991 ला घेतलेल्या थाऊजंड गाडीवरही एमएच.09- 9999 नंबर झळकला. 
दहा वर्षांपूर्वी इनोव्हाचे पहिले मॉडेल त्यांनी खरेदी केले. जीप, मर्सिडीज गाड्यांवर तोच नंबर ठेवला गेला. 
सर्व अंकांची बेरीजही नऊ, हे नंबरचे वैशिष्ट्य. बंगल्यातल्या फोन नंबरच्या अखेरचे अंकही हेच राहिले. मोबाईलचे शेवटच्या चार अंकासाठी नऊलाच टिळा लागला. मुलगा अवदेशच्या गाडीसाठी 9009 हा चेंज म्हणून नंबर घेतला गेला. तो घेताना त्यात नऊ आकडा येईल, याची काळजी घेतली गेली. अयोध्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून त्यांचे प्रकल्प सुरू झाले. जिल्हा तालीम संघ, ब्लड बॅंक, देवल क्‍लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यासह व्ही. बी. म्हणजे 9999 अशी त्यांची आयडेंटिटी तयार झाली. या नंबरमुळे त्यांच्या आयुष्यात काही गमतीशीर किस्से घडतात. केवळ नंबरवरून "व्हीआयपी' आल्याचा सिग्नल सुरक्षारक्षकाला आपोआप मिळतो. 

शरद पवार गाडीत बसतात 
विशेष म्हणजे कृषी संस्कृतीशी त्यांचा धागा तुटलेला नाही. सामाजिक कामांतही त्यांचा पुढाकार राहिलाय. त्यात आजही खंड पडलेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या नावाभोवती वलय तयार झालंय. जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. ते म्हणतात, ""माझ्या गाडीच्या नंबरमुळे मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. कुठेही गेलो तरी आदराचे स्थान दिले जाते. ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापुरात आल्यानंतर माझ्या गाडीत बसतात. देशातील इतका मोठा नेता माझ्या गाडीत बसतो, याचा मोठा अभिमान आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com