लोकसहभागातून उभारणार भव्य राममंदिर 

magnificent Ram temple will be built through public participation
magnificent Ram temple will be built through public participation

कोल्हापूर - अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिराच्या उभारणीसाठी देशभरामध्ये आजपासून "निधी समर्पण अभियानाला' प्रारंभ झाला आहे. देशभरातील 5 लाख गावांमधील 15 कोटी कुटुंबांपर्यंत जावून निधी संकलीत केला जाणार आहे. लोकसहभागातूनच अयोध्येमध्ये भव्य राममंदिर उभारले जाणार आहे. अशी माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी परांडे म्हणाले," राममंदिर निर्माणामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग असावा यासाठी निधी समर्पण अभियान सुरू करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता रहावी यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अधिकृत पावती व कुपनद्वारेच निधी संकलन केले जाणार आहे. या शिवाय ऑनलाईनद्वारेही निधी दिला जाऊ शकतो. निधी समर्पण अभियानामध्ये विश्‍व हिंदी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील अन्य संघटनांचे कार्यकर्ते घरोघरी जावून निधी संकलीत करणार आहेत. यासाठी 10 रुपये, शंभर रुपये आणि 1 हजार रुपयांचे कुपनद्वारे पैसे घेतले जातील. ज्यांना अधिक निधी द्यायचा आहे त्यांच्यासाठी पावती व धनादेशाचीही सुविधा उपलब्ध आहे. देशातील 5 लाख गावांमधील 15 कोटी कुटुंबियांपर्यंत पोहचण्याचा संकल्प आहे. यामध्ये सुमारे 2 हजारहून अधिक संत तर 2 लाखांपेक्षा जास्त रामभक्त सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील बाराशे गावामध्ये निधीसंकलन करण्यात येणार आहे. परदर्शकता ठेवण्यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्याद्वारेच निधी संकलन होईल अन्य कोणी संस्थेने संकलन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

या पत्रकार परिषदेला पू.भगिरथ महाराज यादव, रा.स्व.संघाचे शहर संघचालक डॉ.सूर्यकिरण वाघ, विश्‍व हिंदू परिषदेचे अभियान प्रमूख ऍड.रणजीतसिंह घाटगे, शिवप्रसाद व्यास, रा.स्व.संघाचे प्रचार प्रमूख अनिरुद्ध कोल्हापुरे, जिल्हा कार्यवाह केदार जोशी हे उपस्थित होते. 
 
असे असेल राम मंदिर 
तीन मजली मंदिर असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. एकूण क्षेत्रफळ 2.7 एकर, एकूण निर्माणक्षेत्र 57,400 चौरस फूट, लांबी 360 फूट, रुंदी 235 फूट, कळसापर्यंतची उंची 161 फूट असेल. मंदिर आवारात यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालाय, संशोधन केंद्र, प्रदर्शनी, अभिलेखागार, अतिथी भवन, पार्किंग असेल. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com