मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद : कोल्हापुरात गोलमेज परिषदेत निर्णय

Maharashtra closed on October 10 for Maratha reservation Decision at the Round Table Conference in Kolhapur
Maharashtra closed on October 10 for Maratha reservation Decision at the Round Table Conference in Kolhapur
Updated on: 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय आज कोल्हापूर मधील गोलमेज परिषदेत घेण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आयोजित गोलमेज परिषदेसा  सानेगुरुजी वसाहत मंदिर रावजी मंगल कार्यालय मध्ये सुरुवात झाली. एक मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा निर्धार हात उंचावून व्यक्त केला.


 मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवून समाजाला पूर्ववत आरक्षण मिळावे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीचा परतावा शासनाकडून मिळावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, आदी पंधरा ठराव आज येथील राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषदेत मंजूर झाले. 


महाराष्ट्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती मिळावी, शिवस्मारकाचे काम तातडीने व्हावे, राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना त्वरित शिक्षा मिळावी, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वसतिगृहे व्हावीत, आदी ठराव परिषदेने मंजूर केले आहेत. विजयसिंह महाडिक यांनी ठरावांचे वाचन केले तर भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हे ठराव शासनाला पाठवले जाणार आहेत. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्यासह राज्यातील पन्नासहून अधिक संघटनांचे पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
Pethwadgaon Hatkanangale road accident HDFC bank manager death
leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Kolhapuri Jaggery Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com