स्वप्न साकारणार ः राज्यातील 387 जणांचे पीएसआयचा मार्ग मोकळा

To make the dream come true: pave the way for PSI of 387 people in the state
To make the dream come true: pave the way for PSI of 387 people in the state
Updated on

कोल्हापूर ः पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी त्यांनी पूर्वपरीक्षा दिली. उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षा दिली त्यामध्येही उत्तीर्ण झाले. शारीरिक चाचणी होऊन ते उत्तीर्ण झाले. तरीही त्यांना प्रशिक्षणासाठी बोलावून नोकरीवर रुजू करून घेतले नाही. अशा या 387 विद्यार्थ्यांना चार महिने वर्दीची प्रतिक्षा होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) त्यांना आज नियुक्तीचे पत्र देवून प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. 
याबाबतचे पत्र त्यांना दिल्यामुळे त्यांच्या वर्दीची प्रतिक्षा आता संपली आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना नाशिक किंवा सांगली जिल्ह्यातील तुरची येथे पाठविले जाणार आहे. 
राज्यातील पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी फेब्रुवारी 2018 मध्ये एमपीएससीद्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर मे 2018 मध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा 26 ऑगस्ट आणि दोन सप्टेंबरला 2018ला झाली. त्याचा निकाल तब्बल वर्षाभराने जाहीर झाला. 6 नोव्हेंबर 2019 ते 29 जानेवारी 2020 या दरम्यान शारीरिक चाचणी घेवून अंतिम निकाल 17 मार्चला जाहीर झाला. अंतिम निकालानुसार पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून राज्यातील 387 विद्यार्थी पात्र ठरले. मात्र कोरोना विषाणुच्या महामारी मुळे त्यांना रुजू होण्यासाठी प्रतिक्षेत रहावे लागले. तब्बल चार महिन्यांनी आज त्यांना नुकताच आयोगाने शिफारस पत्र दिल्यामुळे त्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. लवकरच त्यांना वर्दीचा रुबाब अनुभवता येणार आहे. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com