
मुश्रीफ गटाने माकप गटाशी हातमिळवणी करताना श्री भावेश्वरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे.
नानीबाई चिखली (कोल्हापूर) : लिंगनूर कापशी (ता. कागल) येथे एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या मुश्रीफ व मंडलिक गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली असून, यात बाजी कोण मारणार, याचीच उत्सुकता आहे. गतनिवडणुकीत एकत्र असलेल्या मुश्रीफ व मंडलिक गटाने यावेळी सवतासुभा मांडताना एकमेकांविरोधात तोडीस तोड उमेदवार दिले आहेत.
मुश्रीफ गटाने माकप गटाशी हातमिळवणी करताना श्री भावेश्वरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी सरपंच मयूर आवळेकर, गुंडा आवळेकर, आनंदा पोवार, प्रवीण जाधव, शिवाजी मेथे, विलास भोसले करीत आहेत. विरोधात मंडलिक गटाने राजे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, सुभाषबाबू मित्र मंडळ यांच्याशी युती करताना श्री पंत भावेश्वरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे.
हेही वाचा- Good News:कोल्हापूकरांनो कोव्हॅक्सिीन लस दाखल -
याचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य विश्वास कुराडे, सदासाखर संचालक शहाजी यादव,नानासो घाटगे,रामचंद्र यादव, संभाजी यादव करीत आहेत. गेले आठ दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
दृष्टिक्षेपात
एकूण प्रभाग : ३
एकूण जागा : ९
मतदार : १७३३
संपादन- अर्चना बनगे