सांगलीत प्राथमिक आरोग्य केंद्र बनले वनौषधी केंद्र ; शंभरच्यावर वेगवेगळया वनौषधीसह विविध फळांची,फुलांची झाडे

Mangle from Shirala taluka positive story sangli
Mangle from Shirala taluka positive story sangli

मांगले  (सांगली) : शिराळा तालुक्यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे .आरोग्य केंद्राच्या परिसरात शंभरच्यावर वेगवेगळया वनौषधीसह विविध फळांची,फुलांचीझाडे लावण्यात आली आहेत. काही दुर्मिळ वनस्पतीही यामध्ये आहेत .आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एम.घड्याळे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे .डॉ.घड्याळे आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांच्यावर जबाबदारी सोपवून केवळ देखरेख करीत नाहीत तर दिवसातील काही वेळ प्रत्येक झाडाजवळ जावून देखरेख तर करतातच.

मात्र काही देशी रोपांना कलमे बांधण्याचे काम ते करतात .झाडांना कायम स्वरुपी पाण्याची व्यवस्था  व्हावी म्हणून त्यांनी टाकावू  ,जुन्या ठिबक सिंचनाच्या पाईप वापरल्या आहेत .वृक्षारोपाणाचा शासनाचा आदेश आहे म्हणून  वृक्षारोपाण करणारे अधिकारी केवळ वृक्षारोपण करतात त्यानंतर त्याकडे फिरकत नाहीत. पर्यायाने पुढल्या वर्षी त्याच खड्ड्यात पुन्हा वृक्षारोपण करण्यात येते. मात्र मांगले येथील प्रथमिक आरोग्य केंद्र त्याला अपवाद आहे .

सुमारे दीड एकर क्षेत्र आरोग्यकेंद्रासाठी आहे .कायाकल्प योजने अंतर्गत ५० हजाराचे बक्षीस मिळाले आहे.एक एकर क्षेत्रावर विविध फळझाडे,फुलझाडे व इतर प्रकारची झाडे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असणा-या औषधी वनस्पतीमध्ये गुळवेल,शतावरी,ओवा,पुदिना,कोरफड,इन्शुलीन गवती चहा,भृगराज(माका)आवळा,चंदन,दालचिनी,ब्राम्ही,ऑल
स्पाइसेस,केवडा,तुळस,कडीपत्ता,अन्नपूर्णा,मेहंदी,आळू,बेल आदी औषधीवनस्पती आहेत .तर आंबा,नारळ,चिक्कू,फणस,पेरू,कवठ
,केळी,शेवगा,लिंबू,रामफळ,सीताफळ,हनुमानफळ,पपई,चिंच,डाळींब,अश प्रकारची फळझाडे आहेत.गुलाब,शेवंती,कण्हेर,सोनचाफा,जास्वंद,लिली,मे
फ्लावर,ब्रम्हकमळ हि फुलझाडे आरोग्य केंद्राच्या परिसरात गेल्यानंतरस्वाद देतात .

वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एम.घड्याळे – शिराळा तालुक्यात प्रशस्त जागाआणी इमारत असणारे मांगल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे .इमारतीची जागासोडून एक एकर क्षेत्र इमारतीच्या बाजूने रिकामे आहे .त्या जागेचा उपयोगहोत न्हवता ,मला झाडांच्या बरोबर मैत्री करणे आवडते त्यामुळे आरोग्यकेंद्रात रुग्णाची गर्दी कमी झाली की हमखास एखाद्या झाडाला ,कलम बांधणेकिंवा झाडांना पाणी देण्यात मग्न असतो.येथे असणा-या औषधी वनस्पतींचारुंगांच्यासाठी हमखास उपयोग करतो.अनेक जुन्या आजारासाठी या ठिकाणच्याऔषधी वनस्पती उपयोगी आहेत.या बरोबरच फळझाडांना लागणारी फळे शस्त्रक्रिया
केलेले रुग्ण किंवा अ̐डमिट  असणा-या पेशंटसाठी उपयोगी ठरत आहेत .

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com