यंदा आंब्याविनाच होणार अक्षय तृतीया ! या सणाला का आहे आंब्याचे महत्व ?

Mango has not entered the Nipani market due to a month-long lockdown on the back of corona.
Mango has not entered the Nipani market due to a month-long lockdown on the back of corona.
Updated on

निपाणी - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या सणाला आंब्याचे महत्त्व असून पूजेसाठी मोठी खरेदी होते. सण केवळ तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून लॉक डाऊनमुळे निपाणी बाजारपेठेत आंब्याची आवक झालेली नाही. त्यामुळे अक्षय तृतीया आंब्याविनाच साजरी करण्याची वेळ यंदा आली आहे.

गुढीपाडव्याला हिंदू वर्षाची सुरुवात होते. पण वर्षाच्या पहिल्या सणालाच कोरोनाचे विघ्न आडवे आले. त्यामुळे या सणाची खरेदी-विक्रीही झाली नाही. त्यापाठोपाठ आता रविवारी (ता. २६) अक्षय तृतीया साजरी होणार आहे. या दिवशी चांगला मुहूर्त असल्याने नवीन वाहन खरेदी, नवीन वास्तूत गृहप्रवेश, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच कुटुंबातील दिवंगत सदस्यांना नैवद्य देऊन पित्र, सुवासिनींला आमरस, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यावर्षी कोकण विभागामध्ये आंब्याचे चांगले उत्पादन झाले आहे. दरवर्षी मार्च महिन्यात आंब्याची आवक सुरू होते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठा बंद असल्याने आंबा उत्पादक बागायतदार चिंतेत आहेत. तर काही आंबा उत्पादक शेतकरी रेल्वेच्या मालगाडीने आंब्याची मोठमोठ्या शहरात निर्यात करत आहेत. त्यामुळे यंदा या भागातील खवय्यांना आंबा चाखायला मिळतो की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर सकाळच्या सत्रात शहराच्या ठिकाणी दोन-तीन तास शिथीलता केली जात आहे. पण केवळ जिल्हा अंतर्गतच काही जीवनावश्यक वस्तूंची वाहने ये-जा करीत आहेत. त्यामुळे कोकण विभागातून आंब्याची आवक थांबली आहे. केवळ भाजीपाला व किरकोळ धान्याची आवक होत आहे.

उलाढालीवर होणार परिणाम

अक्षय तृतीया हा सण खरेदीसाठी शुभ मानला जात असल्याने आंब्यासह जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण यंदा आंब्याच्या उलाढालीवर मोठा परिणाम होणार असून आंबा उत्पादक शेतकर्‍यासह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.
 

'यंदा कोकण विभागामध्ये आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. पण लॉक डाउनमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने आंब्याची आवक, जावक थांबली आहे. परिणामी यंदा अक्षय तृतीयेला आंबा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.'
- करीम बागवान, आंबा व्यापारी, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com