
इचलकरंजी - नदी उशाला मात्र कोरड घशाला अशीच अवस्था नदीकाठच्या असलेल्या शिरोळ तालुक्यातील अनेक गावांची आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर शिरोळ तालुक्यातील टाकवडे, शिरढोण, कुरुंदवाड, शिरोळ येथील बागडी समाजावर २० वर्षांहून अधिक काळ नदी प्रदूषणाच्या काळात उपासमारीची वेळ येते. त्याबाबतही शासनाकडे दाद मागून अद्याप या समाजाला न्याय मिळत नाही.
पंचगंगा नदी प्रदूषित करणारे अनेक उद्योग इचलकरंजी आणि परिसरामध्ये सुरू झाले. अनेक घटकांनी पाण्यावर प्रक्रिया करणारी सयंत्रणा बसवली. मात्र काही ठिकाणच्या यापूर्वीच्या उद्योगामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांना आपले हक्काचे पाणी कायमचे गमवावे लागले. जानेवारी ते मे या कालावधीत पंचगंगा नेहमीच दूषित राहू लागली. आणि दुसऱ्या बाजूला औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यामुळे गावा गावातील विहिरी रसायनयुक्त बनल्या. त्यामुळे नदी गावाजवळ असूनसुद्धा आणि हक्काची विहीर असूनही अनेकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
आता हक्काचे पाणी सोडून ठिकठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना पाणीत विकत आणण्याशिवाय पर्यायच नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे.
दुसऱ्या बाजूस शिरोळ तालुक्यातील शिरढोणसह विविध गावात मोठ्या प्रमाणात बागडी समाज आहे. पंचगंगा नदीतील मासेमारी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र दूषित पाणी आले की मृत माशांचा खचच पात्राकडेला पडतो. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येते. या भागातील बागडी समाजाने याप्रश्नी दोनवेळा थेट मंत्रालय गाठले. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत शासनाने २००७ मध्ये श्वेतपत्रिकाही काढली. मात्र आज अखेर ठोस अशी कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या गावातील बागडी समाजाला तब्बल १५ वर्षे संघर्ष केल्यानंतरही न्याय मिळत नाही अशी अवस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.