'स्वराज्य दिना' बद्दल हसन मुश्रीफांचा होणार नागरी सत्कार ; मराठा महासंघाच्या बैठकीत ठराव

संदीप खांडेकर
Monday, 4 January 2021

या निर्णयाचे शिवप्रेमींच्या वतीने स्वागत करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी मराठा महासंघ २००६ पासून कोल्हापुरात विविध समाज बांधव, शिवप्रेमीना घेवून प्रयत्न करत आहे. नुकताच महाआघाडी सरकारतर्फे यंदापासून ६ जून शिवराज्याभिषेक दिन 'स्वराज्य दिन' म्हणून गावोगावी, शासकीय कार्यालये येथे साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. या निर्णयाचे शिवप्रेमींच्या वतीने स्वागत करून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.

यावेळी मुळीक म्हणाले, 'या निर्णयामुळे राज्याभिषेक घराघरांत पोचणार आहे. यासाठी लवकरच मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मोल आणि महत्त्व समाजापुढे यावे यासाठी मराठा महासंघाच्या वतीने दरवर्षी ६ जूनला सर्वधर्मीय शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येते.

यामध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याचा आढावा असणारे फलक, मर्दानी खेळांचे प्रात्यशिक, यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत व्याख्याने, प्रदर्शन, वृक्षारोपण, घरोघरी गुढीच्या माध्यमातून केले जाते. 'इंद्रजित सावंत' यांनी कोल्हापुरातून सुरू झालेला हा सोहळा राज्याबरोबर देशात सुरु झाला याचा  अभिमान आहे, असे सांगितले.

हेही वाचा - छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला जो विचार दिला, जी शिकवण दिली त्याची प्रेरणा जगवण्याचे काम यानिमित्ताने केले जाईल

यावेळी शंकरराव शेळके, बबनराव रानगे,शशिकांत पाटील, उत्तम जाधव, अमित अडसुळे, कादर मलबारी, प्रकाश पाटील, अशोक माळी, आनंद म्हाळूंगकर, महादेव पाटील, गुरुदास जाधव, जयवंत पलंगे, शरद साळुंखे, संजय कांबळे  उपस्थित होते.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha mahasangh kolhapur awarded by hasan mushrif in for the decision in kolhapur