यंदा 'कर्तव्या'साठी करावी लागणार गडबड!

the marriage ceremony date for this year only 62 in sangli
the marriage ceremony date for this year only 62 in sangli

पेड : भारतीय संस्कृतीत असलेल्या 16 संस्कारांतील विवाह संस्कार हा महत्त्वाचा विधी आहे. 27 नोव्हेंबरपासून यावर्षी विवाह मुहूर्त सुरू होत असल्याने विवाह समारंभाचा धूमधडाका उडणार आहे. 18 जुलै 2021 पर्यंत सुरू राहणाऱ्या लग्नसराईत यंदा तब्बल 62 मुहूर्त आहेत. त्यामुळे शुभमंगल सावधान हे सूर सनई-चौघड्यांच्या स्वरासह आता सर्वत्र गुंजणार आहेत. 

तुळशी विवाहाला 26 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे 27 नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरवात झाली आहे. परंतु खऱ्याअर्थाने लग्नाचा धूमधडाका हा फेब्रुवारी नंतरच दाट होतो. त्यामुळे यावर्षी कापडबाजार व सराफा बाजार तेजीत राहणार आहे. यासोबतच किराणा दुकानदार, बॅंडवाले, कॅटर्स, आचारी, घोडेवाले, प्रवासी वाहने आदींचेही अच्छे दिन असल्याचे दिसून येतात. यावर्षी विशेष म्हणजे मार्च महिन्यात एकही लग्नाचे मुहूर्त आलेला नाहीत. 

यंदाच्या लग्नसराईत फेब्रुवारी महिन्यात 9, तर मे महिन्यात सर्वाधिक 16 विवाह मुहूर्त असून या दोन महिन्यांत 25 मुहूर्त आहेत. यावर्षी मार्च महिन्यात एकही विवाहाचा मुहूर्त आलेला नाही. त्यामुळे वधू-वरांना फेब्रुवारी नंतर एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. 25 फेब्रुवारीपासून जवळपास 21 एप्रिलपर्यंत विवाह मुहूर्त नाहीत. विवाह मुहूर्त निवडताना अनेकजण सुट्यांचा विचार करीत असतात. त्यामुळे साधारणत: रविवारच्या मुहूर्तावर भर असतो. मे महिन्यात शासकीय सुट्या असतात. त्यामुळे नोकरदार क्षेत्रातील मंडळी या दिवसांना प्राधान्य देतात. मे महिन्यात सर्वाधिक विवाहाचे मुहूर्त आल्याने या महिन्यात लग्नाचा बार मोठ्या प्रमाणात उडणार आहे. 

विवाहाच्या तिथी पुढीलप्रमाणे 

डिसेंबर - 1, 7, 8, 9, 17, 19, 23, 24, 27 
जानेवारी - 3, 5, 6, 7, 8, 9, 10 
फेब्रुवारी - 1, 2, 3, 4, 8, 15, 16, 24, 25 
मार्च - या महिन्यात एकही मुहूर्त नाही. 
एप्रिल - 22, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 
मे - 1, 2, 3, 4, 5, 8, 13, 15, 20, 21, 22, 24, 26, 28, 30, 31 
जून - 4, 6, 16, 19, 20, 26, 27, 28 
जुलै - 1, 2, 3, 13, 18  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com