
अमर रहे, अमर रहे संग्राम पाटील अमर रहे ! वंदे मातरम...!, भारत माता की जय.....! या घोषणांनी राहत्या घरापासून घ क्रीडांगणपर्यंतचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता
चुये (कोल्हापूर) : - शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्यावर आज सकाळी निगवे खालसा गावात व क्रीडांगणावर पोलिस व सैन्य दलाच्या वतीने प्रत्येकी तीन बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले. संग्राम यांनी देशसेवेसोबतच कुटुंबाचीही सेवा केली. परंतु, त्यांच्या निधनाने त्यांचे घराचे स्वप्न अपुरेच राहिले.
संग्राम पाटील यांनी फेब्रुवारीपासून नवीन घर बांधकाम सुरू केले होते. एक डिसेंबरला सुट्टीवर आल्यानंतर उरलेले काम पूर्ण करूनच पुन्हा कामावर जाणार असा निरोप त्यांनी दूरध्वनीवरून दिला होता. याच घरासमोर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आणि सर्व कुटुंबियांनी हंबरडा फोडला होता.
अमर रहे, अमर रहे संग्राम पाटील अमर रहे ! वंदे मातरम...!, भारत माता की जय.....! या घोषणांनी राहत्या घरापासून घ क्रीडांगणपर्यंतचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. अंत्ययात्रा मार्गावर सुवासिनींनी औक्षण केले, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली .
छोट्या बालकांनी हातामध्ये राष्ट्रध्वज व संग्राम पाटील अमर रहे... चे फलक हातात घेऊन संग्राम पाटील यांना श्रद्धांजली वाहिली होती.
छोट्या शिवश्रीला समजण्याचा प्रयत्न....
शहीद जवान संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य (8),शिवश्री (2) हे दोघेजण निर्विकारपणे पार्थिवाच्या पेटीकडे पाहत होते मात्र आपल्या आईकडे जाण्यासाठी छोटी मुलगी शिवश्री रडत असताना त्यांचे आजोबा भाऊ कसा शांत बसलाय तू रडू नकोस असे समजण्याचा प्रयत्न करत होते. चवील शिवाजी,भाऊ संदीप,
घर बांधलेले डोळे भरून संग्रामने बघितलं नाही अस म्हणतच वडिलांनी हंबरडा फोडला होता
मित्राची अखेर पर्यंत साथ...
निगवे खालसाचा मित्र राहुल सावंतने शहीद संग्राम पाटील यांच्यावर हल्ला झाल्यानंतरची घटना घडल्यापासून अंत्यसंस्कार होईपर्यंत मित्र आणि एक सैनिक यांची भूमिका पार पाडली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता संग्रामवर हल्ला झाल्यानंतर पहिली बातमी राहूलनेच गावकऱ्यांना तर त्यांचे पार्थिव विमानातून आणण्यापासून अंत्यसंस्कार होईपर्यंतच्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या राहुल सावंतने सैनिक म्हणून पार पडल्या मात्र संग्राम चा घरी आल्यानंतर सर्व कुटुंबियांना सांगताना त्यांचे अश्रुचे बांध फुटले......
हे पण वाचा - चार खासदारांच्या पक्षाचे अध्यक्ष लोकनेते तर..., भाजप आमदाराची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
सैन्यदलात भरती होण्यासाठी सराव करणाऱ्या मैदानावरच संग्राम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज सैन्यदलाने संग्राम पाटील यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला....
हे पण वाचा - महाराष्ट्र केसरीचा शड्डू जानेवारी किंवा फेब्रुवारीत घुमणार? शरद पवार यांचा पाठपुरावा
अंतयात्रा अंत्यसंस्काराचे चित्रीकरण मोठ्या स्क्रीनवर...
अंतयात्रेचे चित्रीकरण व क्रीडांगणातील अंत्यसंस्कार ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या मुख्य चौकांमध्ये मोठे स्क्रीन उभारून लोकांची सोय केली होती.
संपादन - धनाजी सुर्वे