पन्हाळा बंद असल्याने पर्यटकांच्या झुंडी वळाल्या 'या' ठिकाणी... पण यामुळे 'या' गावांना आहे धोका...

The Masai Pathar is crowded with tourists in panhala
The Masai Pathar is crowded with tourists in panhala
Updated on

आपटी (पन्हाळा) - कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाने गेली तीन ते चार महिने पन्हाळ्यावर पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे.सध्या देशभरात
अनलॉक १ चालू झाला आहे पण महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या मुळे पन्हाळा पर्यटनासाठी बंदच आहे.त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनासाठी पर्याय म्हणून मसाई पठाराची निवड केली असून आता मसाई पठारावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. प्रामुख्याने पर्यटन करण्यास बंदी कायम ठेवली आहे.त्याचे पन्हाळा नगर परिषदेकडून काटेकोर पालन केले जात आहे. पन्हाळगडाचे मुख्य प्रवेशव्दार असलेला चार दरवाजावरील तीन महिन्यापूर्वी लावलेली बॅरीकेट आजही तशीच आहेत.त्यामुळे पन्हाळगडावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना चारदरवाज्यातूनच परतावे लगत आहे.त्यामुळे आपोआपच पर्यटकांची पावले मसाई पाठराकडे वळू
लागली आहेत.

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मसाई पाठरावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र अशा येणाऱ्या पर्यटकांच्या झुंडी मुळे पठाराच्या कुशीत वसलेल्या व मसाई पठाराचे प्रवेशव्दार असलेल्या म्हाळुंगे गावात गाड्या लावण्यासाठीही जागा मिळेनाशी झाली आहे.मुळातच म्हाळुंगे गाव दुर्गम असल्याने येथे येणारे पर्यटकही कोरोनाच्या पार्श्व भूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमाचे पालन करत नाहीत. त्या
बरोबरच येणाऱ्या पर्यटकांमध्ये मद्यपी पर्यटकांची संख्या जास्त आहे.हे पर्यटक बिनधास्तपणे उघड्यावरच मद्यपान करतात.तर हे मद्यपी येथून जा-ये करणाऱ्या स्थानिक नागरिकांबरोबरच कुटूंबासह आलेल्या पर्यटकांना त्रास
देतात.अशा वेळी स्थानिक नागरिकांनी मद्यपानास विरोध केल्यास वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.या गोष्टीची पोलीस प्रशासनाने हद्दिचा वाद उपस्थित न करता वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

या वाढत्या गर्दीमुळे येथे सोशल डिस्टन्सींगचा पुरता फज्जा उडाला आहे.त्यामुळे म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.ही पर्यटकांची गर्दी आटोक्यात आणणे स्थानिक प्रशासनाच्या आवाक्या बाहेर गेले आहे.जर तालुका प्रशासनाने स्थानिक प्रशासनास बळ दिल्यास येथील नागरिक कोरोनाच्या संभाव्य धोक्या पासून वाचू शकतील.तरी तालुका प्रशासनाने याबाबीची वेळीच
दाखल घेऊन योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज आहे.

पर्यटकांच्या मुळे बुधवारपेठ,नेबापूर,मंगळवारपेठ,आपटी तुरुकवाडी यां गावांनाही धोका आहे.तर या पर्यटकांच्या गर्दीला आवर घालणे स्थानिक प्रशासनाच्या हात बाहेरचे आहे.त्यासाठी आम्हाला तालुका व पोलीस प्रशासनाच्या मदतीची गरज आहे.
           सौ.प्रियांका महाडिक - सरपंच जेऊर/म्हाळुंगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com