कुरली शाळेत पृथ्वीच्या परीघाची मोजणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

विज्ञान प्रसार, नवी दिल्ली व ज्योतिर्विद्या प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे 13 मे रोजी संपूर्ण देशात पृथ्वी परीघ मोजणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. अरविंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील 85 विज्ञान प्रसार नेटवर्क क्‍लब संयोजकांनी यात सहभाग घेतला. या मोहिमेत रयत शिक्षण संस्थेच्या कुरली येथील सिद्धेश्‍वर विद्यालयातील सर सी. व्ही. रामन विपनेट क्‍लबतर्फे एस. एस. चौगुले सहभागी झाले.

नानीबाई चिखली ः विज्ञान प्रसार, नवी दिल्ली व ज्योतिर्विद्या प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे 13 मे रोजी संपूर्ण देशात पृथ्वी परीघ मोजणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. अरविंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील 85 विज्ञान प्रसार नेटवर्क क्‍लब संयोजकांनी यात सहभाग घेतला. या मोहिमेत रयत शिक्षण संस्थेच्या कुरली येथील सिद्धेश्‍वर विद्यालयातील सर सी. व्ही. रामन विपनेट क्‍लबतर्फे एस. एस. चौगुले सहभागी झाले.

 
ज्योतिर्विद्या प्रतिष्ठान, पुणे येथील दीपक जोशी यांनी क्‍लबच्या संयोजकांना "जीपीएस'द्वारे त्यांचे अक्षांश, रेखांश, सूर्य झीरो बिंदूवर येण्याची वेळ याचा तपशील दिला. डॉ. रानडे यांनी पृथ्वी परीघ मापनपद्धतीचा इतिहास, विविध मापनपद्धती याबाबत ऑनलाइन मार्गदर्शन केले. पुणे येथे 13 मे रोजी शून्य सावली दिवस होता. ते मध्यवर्ती केंद्र मानून भारतातील सर्व राज्यांतील वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाचवेळी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत नेमोंन सावलीच्या नोंदी घेतल्या गेल्या. या वेळी दीपक जोशी, सागर गोखले, अनिरुद्ध देशपांडे, अथर्व पाठक यांनी अहवालाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

एक मिनीट अंतराने 28 नोंदी 
दरम्यान, एस. एस. चौगुले यांनी 48 सेंटिमीटर उंचीचा व आठ मिलिमीटरचा नेमोंन सपाट प्लायवूडवर लंबरूपात पृष्ठभागावर बसविला. आलेख कागद त्यावर ठेवून होकायंत्राच्या सहाय्याने दक्षिण-उत्तर दिशेची नोंद केली. "जीपीएस'च्या सहाय्याने वेळ निश्‍चित करून सुरवातीला प्रत्येक 10 मिनीट अंतराने व शून्य बिंदूवर एक मिनीट अंतराने नेमोंनच्या 28 नोंदी करून त्याचा अहवाल पुणे येथे पाठविला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Measuring The Circumference Of The Earth In The Kurli School Kolhapur Marathi News