
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन आणि पंचगंगा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्ससह विविध स्टाफची कमतरता असल्याने त्याचा सेवेवर परिणाम होत आहे, ही गंभीर बाब असून, प्रशासन याकडे कानाडोळा का करते? असा सवाल महिला नगरसेविकांनी आज प्रशासनाला केला. तातडीने कारवाई करा, असा इशाराही दिला. शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याकडेही सभागृहाचे लक्ष वेधले. पाणी आणि आरोग्य या विषयावरुन सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.
पूजा नाईकनवरे म्हणाल्या, ""गरिबांना महापालिकेची रुग्णालये आधार आहेत, पण या रुग्णालयात अनेक गैरसोयी आहेत. डॉक्टर्स नाहीत, औषधे नाहीत. रुग्णांना औषधाच्या पाच हजार रुपयांच्या चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात. खासगी मेडिकल आणि रुग्णालयातील काही जणांचे लागेबंधे असण्याची शक्यता आहे.'' शोभा कवाळे म्हणाल्या, ""या रुग्णालयासाठी महिला बालकल्याण समितीने सर्व निधी दिला आहे, तरीही अनेक कामे झालेली नाहीत. महिलांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात अस्वछता आहे. जयश्री चव्हाण यांनीही रुग्णालयातील गैरसोयीविषयी नाराजी व्यक्त केली.'' उपायुक्त निखिल मोरे यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
सवलती देण्यात दिरगांई का? : शेळके
राजसिंह शेळके म्हणाले, ""महापुराने बाधित झालेल्या मिळकतधारकांना एक महिन्याची घरफाळा सवलत देण्यात येणार होती, पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महापूर येऊन वर्षे उलटले तरी सवलतीचा पत्ता नाही. प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे. सर्वसामान्यांसाठी की, बड्यांसाठी हे स्पष्ट करावे. एक खिडकी योजनाही बंद असून, अनेक दारातूनच महापालिकेचा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.'' राजेंद्रनगरातील बाधितांनाही सवलत मिळाली नसल्याचा मुद्दा रूपाराणी निकम यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.