मोठ्या संख्येने या ; मुश्रीफ, सतेज पाटील यांचे आवाहन

the meeting of members of gokul in kolhapur organised for 3 february in kolhapur
the meeting of members of gokul in kolhapur organised for 3 february in kolhapur
Updated on

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सभासदांचा रहावा. दूधाला जास्ती-जास्त दर मिळावा यासाठी गोकुळ बचाव कृती समितीच्यावतीने लढा सुरुच आहे. दरम्यान, गोकुळची वार्षिक सभा संघाच्या कागल पंचतारांकीत एम. आय. डी. सी. परिसरातील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे बुधवार (3) दुपारी 1 ला होणार आहे. यासाठी सर्वच सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. 

निवेदनामध्ये म्हटले आहे की, गोकुळच्या लेखापरिक्षण अहवालात अनेक्ष आक्षपार्ह बाबी निदर्शनास आल्या आहेत. यासाठी, सभासदांनी यावर आवाज उठविण्यासाठी गोकुळ सभेला उपस्थित राहिले पाहिजे. गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून गोकुळच्या भ्रष्ट कारभाराबद्दल सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. गोकुळ दूध संघ हा सभासदांच्या मालकीचा रहावा आणि दूध उत्पादकांना जास्तीतजास्त दर मिळावा यासाठी हा लढा सुरु आहे. या लढ्याला दूध उत्पादक सभासदांचे आजपर्यंत मोठे पाठबळ मिळाले आहे. 

सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सत्तारुढ गटाच्या कारभारा संदर्भात जाब विचारण्याची संधी दूध उत्पादक सभासदांना मिळणार आहे. गोकुळचा ऑडिट रिपोर्ट आणि अहवाल पाहता अनेक आक्षेपार्ह बाबी यामध्ये निदर्शनास आल्या आहेत. याबाबत सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून याबद्दल सत्तारुढ गटाला जाब विचाराला पाहिजे, असेही आवाहन केले आहे. यासाठी जास्ती-जास्त सभासदांनी उपस्थित राहून गोकुळ पदाधिकारी व प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Police System
Rajaram Puri Ganesh Procession
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com