esakal | गोकुळ सभेत गोंधळ: घोषणाबाजीने वातावरण तापले

बोलून बातमी शोधा

Meetings of District Co operative Milk Producers Association GOKUL update marathi news

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील खाद्य विभागाच्या मैदानावर घेण्यात आली. 

गोकुळ सभेत गोंधळ: घोषणाबाजीने वातावरण तापले
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर  : जिल्हा दूध संघावच्या 2018/19 या वार्षिक सभेचा पहिलाच विषय वदाचा ठरला. ही सभा झालीच नाही असा आक्रमक पवित्रा कृती समितीने घेतला. त्यामुळे सभेच्या पहिल्याच मुद्यावरून सभा वादळी ठरत आहे. विश्‍वास देवकर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सभेचे अध्यक्ष म्हणून नरके यांनी सभेचा वृत्तांत वाचून दाखवावी, अशी मागणी केली. यावेळी समितीच्या सदस्यानी ठिय्या मांडला. अजून ही सभेत गोंधळ सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील खाद्य विभागाच्या मैदानावर घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही नेते मंडळी या सभेस उपस्थितीत नव्हते. कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन रवींद्र आपटे यांची छोटीशी शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे ते सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठराव करून अध्यक्ष आणि तज्ञ अरुण नरके यांना चेअरमनपद देण्यात आले. 

हेही वाचा- गोकुळ बचाव कृती समितीचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक

सभेमध्ये माझी निवड झाल्यामुळे मी तुमच्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे, असे सांगून सर्वसाधारण सभा सुरू करण्याचे  नरके यांनी जाहीर केले. रवींद्र आपटे यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप जाहीर केली.  सभा सुरू होताना सभा अध्यक्ष नरके यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. सभेत कोणताही गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी दूध संघाची सद्यस्थिती सांगितली. गुजरात मध्ये दूध विक्री होत आहे ही आनंदाची बाब असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.  घाणेकर यांनी सभेचा वृत्तात वाचून दाखविला. यावेळी सर्व विषय वाचून दाखवा, अशी मागणी सभासदांतुन पुढे आली. त्यानुसार विषयाचे वाचन सुरू झाले. त्याचे वाचन सुरू झाल्यानंतर माईक द्या, माईक  द्या, अशी मागणी सभासदांनी केली.

नेत्यांची गैरहजेरी
 
माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, हे संचालक मंडळाचे पाठीराखे तर गोकुळ बचाव कृती समितीचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके.

संपादन- अर्चना बनगे