esakal | हिंदकेसरी खंचनाळे यांचे स्मारक उभारणार ः पालकमंत्री सतेज पाटील

बोलून बातमी शोधा

A memorial of Hindkesari Khanchanale will be erected: Guardian Minister Satej Patil}

कोल्हापूर  : देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे यथोचित स्मारक उभे करू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

kolhapur
हिंदकेसरी खंचनाळे यांचे स्मारक उभारणार ः पालकमंत्री सतेज पाटील
sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर  : देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे यथोचित स्मारक उभे करू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 
जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे आयोजित हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान नामेदव पाटील - महेकर आणि वस्ताद मुकुंद करजगार यांच्या आदरांजली सभेप्रसंगी ते बोलत होते. श्री पाटील पुढे म्हणाले कि, कुस्तीची पंढरी असलेल्या आपल्या कोल्हापूरच्या लाल मातीत कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी संपूर्ण देशातून हजारो पैलवान येतात. या पैलवानांना आपल्या अनुभवाने व कौशल्याने कुस्तीचे अनेक डाव शिकविणारे व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवान तयार करणारे हे सर्व वस्ताद कोल्हापूरला लाभले. संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी वाहून घेतलेल्या या कुस्तीगीरांचे स्मारक होणे गरजेचे आहे. या साठी तालीम संघाने जागा सुचवावी या साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी संगितले. 
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, तालीम संघाचे उपाध्यक्ष, ऑल इंडिया चॅम्पियन, पैलवान नामेदव पाटील-महेकर, ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक मुकुंद करजगार यांचे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी तालीम संघाच्यावतीने मोतीबाग तालीम इथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन करण्यात आले. 
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले,"" कोल्हापूर ही कुस्तीपंढरी असून या ठिकाणी जागतिक दर्जाचे मल्ल तयार झाले. असे अनेक दिग्गज मल्ल घडवण्याचे काम हिंदकेसरी खंचनाळे, वस्ताद मुकुंद करजगार यांच्यासारख्या वस्तादांनी केले आहे. त्यांचा हा वारसा जपणे हीच खरी आदरांजली ठरणार आहे.'' 
महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या कि अनेक मल्लांचे प्रेरणास्थान हरपले असून असा मल्ल पुन्हा होणे नाही. आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, हिंदकेसरी खंचनाळे हे बुद्धिजीवी पैलवान होते. तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, कुस्ती संग्रहालयासाठी तालीम संघ पुढाकार घेईल.यावेळी तालमी संघाचे चीफ पेट्रन बाळ गायकवाड, विष्णू जोशीलकर, कुस्ती मल्लविद्येचे गणेश मानुगडे, सरदार पाटील, प्रकाश खोत, वसंत पाटील, अमोल चौगुले, ज्युनिअर दादू चौगले, गुंडा पाटील, महादेव जाधव, लहूजी शिंदे, राम यादव, कुस्ती अभ्यासक अमितकुमार गाठ, विजय साळोखे, संदीप देसाई, चंद्रकात चव्हाण, बाबा महाडिक, संभाजी जगदाळे, आदी उपस्थित होते. 


पालकमंत्री सतेज पाटील - धनंजय महाडिक एकाच व्यासपीठावर 
आदरांजली सभेच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक बऱ्याच काळानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मात्र, सभेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याशिवाय एकमेकांची नजरानजरही झाली नाही.