बंगळुरातून तीन हजार मजूर बेळगावात...

 migrant workers from Bangalore have started arriving in Belgaum
migrant workers from Bangalore have started arriving in Belgaum
Updated on

बेळगाव - बंगळूरमधील स्थलांतरीत कामगारांचा लोंढा बेळगावात दाखल होऊ लागला आहे. कामाच्या शोधात तसेच कामानिमित्त बंगळूरमध्ये अडकून पडलेले मजूर मागील तीन दिवसापासून परिवहन मंडळाच्या बसमधून घरवापसी करीत आहेत. आतापर्यंत तीन हजारहून अधिक मजूर बेळगावात दाखल झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.

राज्याच्या विविध भागात अडकून पडलेल्या मजुरांची राज्य शासनाकडून घरवापसी केली जात आहे. यासाठी परिवहनच्या बसेस वापरल्या जात असून यासाठीचा खर्चही शासनाने उचलला आहे. 1 मेपासूनच बंगळूर येथून याचा कार्यारंभ झाला होता. मात्र, बेळगावचे कामगार 5 मे रोजी बंगळूरातून बेळगावात दाखल झाले. बेळगावातूनही 4 मेपासून परिवहन मंडळाने येथे अडकून पडलेल्या यादगीर जिल्ह्यातील स्थलांतरितांची घरवापसी केली. बंगळूरमधून आतापर्यंत सुमारे तीन हजार मजूर बेळगावात दाखल झाले आहेत. मंगळवार (ता. 5) व बुधवार (ता. 6) या दोन दिवसात 2,100 मजूर दाखल झाले होते. तर गुरुवारी बेळगावात सुमारे 900 हून अधिक कामगार दाखल झाले.

बेळगावात दाखल झाल्यानंतर या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्याच्या तक्रारी आढळून आल्यास अशा कामगारांना बेळगाव शहरातच क्वारंटाईन केले जात आहे. तर इतरांना त्यांच्या घरी पाठविले जात असून त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. स्थानिक वैद्याधिकारी, आशा कार्यकर्त्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली असून मजूरांवर त्या लक्ष ठेवून राहणार आहेत. पुढील दोन दिवसात मजुरांची ही संख्या पाच हजाराचा टप्पा गाठण्याची शक्‍यता परिवहन मंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

 migrant workers from Bangalore have started arriving in Belgaum kolhapur poltics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com