हिम्मत असेल तर तुमच्या संघात दर देऊन दाखवा ; गोकूळ पदाधिकाऱ्यांना दिला टोला ..कोणी वाचा...

 milk agitation for kolhapur and satej patil comments for chandrakant patil in kolhapur
milk agitation for kolhapur and satej patil comments for chandrakant patil in kolhapur

कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाचे आंदोलन म्हणजे केवळ "स्टंट' आहे. राज्यातील दूध उत्पादकांसाठी केंद्र सरकारने काय केले हे आधी भाजपच्या नेत्यांनी सांगावे. हिंम्मत असेल तर भाजप नेत्यांशी संबंधीत असणाऱ्या संघात आधी दोन रुपये अधिक दर देऊन दाखवा. असे आव्हान सतेज पाटील यांनी दिले. या विधानातून त्यांनी गोकूळ संचालकांना नाव न घेता टोला लगावला. 


भारतीय जनता पक्षाने आज राज्यात दूध दर वाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. याबाबत प्रसार माध्यमांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता त्यांनी भाजपचा स्टंट असल्याचे सांगून आंदोलनाची खिल्ली उडवली. यावर मंत्री पाटील म्हणाले,"स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपने केलेला हा "स्टंट' आहे. आधी दूधाचे टॅंकर मार्गस्थ झाले मग त्यांनी आंदोलन केले. मुळात केंद्र सरकारने राज्यातील दूध उत्पादकांसाठी काय केले याचे उत्तर भाजप नेत्यांनी द्यावे.

केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करून व्यापाऱ्यांचे हीत साधले. स्थानिक पातळीवर बोलायचे झाल्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधीत असणाऱ्या संघाचा दर किती ? भाजपचे पदाधिकारी त्या संघात संचालक आहेत. या संघात 26 रुपये दराने दूध घेतात आणि 58 रुपयांनी विकतात. सर्व खर्च वजा करूनही 24 रुपये शिल्ल राहतात ते जातात कुठे? त्यांच्यात हिंम्मत असेल तर आधी तुमच्या संघात 2 रुपये जास्त दर देऊन दाखवा.' 

दादा आता पुण्याचे झालेत... 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सतेज पाटील म्हणाले, "दादा आता पुण्याचे झाले आहेत. म्हणून त्यांनी दूधाचे आंदोलन पुण्यात केले. गेल्यावेळी ते सुट्टीला म्हणून कोल्हापुरात आले होते. त्यांच्या सुट्टीच्या आणि आंदोलनाच्या तारखा एक आल्याने त्यांनी कोल्हापुरातून आंदोलन केले होते.'  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com