'गोकुळ'ची गाय दूध खरेदी दरात कपात ;  कोरोनाचा दणका शेतकऱ्यांना  

Milk producers suffer from a decline in milk sales due to lockdown
Milk producers suffer from a decline in milk sales due to lockdown
Updated on

कोल्हापूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाची विक्री घटल्याचा फटका दूध उत्पादकांना बसला असून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाईच्या दूध खरेदी दरात प्रती लिटर दोन रुपयांची कपात कालपासून सुरू केली. पूर्वी 29 रुपये प्रती लिटर दराने खरेदी केले जाणारे गाईचे दूध यापुढे प्रती लिटर 27 रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. 

देशात आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे संघाच्या दूध विक्रीत दररोज किमान चार ते पाच लाख लिटरची घट झाली आहे. विशेषतः मुंबईत आणि पुण्यातील दूध विक्रीत मोठी घट झाली आहे. मुंबईत दररोजची विक्री दोन ते अडीच लाखांनी, तर पुण्यात लाखभर लिटरनी घटली आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या दुधापासून दूध पावडर तयार केली जाते. दूध पावडर निर्मितीचा उत्पादन खर्च हा जास्त आहे. त्यामुळे संघाने हा निर्णय घेतल्याचे यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

राज्यातील इतर संघाच्या तुलनेत "गोकुळ' गाय दुधाचा प्रती लिटर खरेदी दर दोन रुपयांनी जास्त आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यातील संघांनी गायीचे दूध प्रतिलिटर 25 रुपयांवरून 20 रुपये दराने खरेदीचा निर्णय घेतला. त्याला उत्पादकांनी विरोध केल्यानंतर शासनाने रोज दहा लाख लिटर गायीचे दूध प्रतिलिटर 25 रुपये दराने खरेदी करण्याची घोषणा केली; पण जिल्ह्यात "गोकुळ'ने मात्र कोरोनामुळे अगोदरच संकटात असलेल्या दूध उत्पादकांवर दर कपातीचे हत्यार उपसले आहे. 

आज 9 लाख 13 हजारच विक्री 

आज संघाची मुंबई, पुण्यासह कोल्हापुरातील दूध विक्री 9 लाख 13 हजार लिटर झाली आहे. मुंबईत सहा लाख सात हजार, पुण्यात 1 लाख 77 हजार, तर कोल्हापुरात 1 लाख 28 हजार लिटर दुधाची विक्री आज झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com