esakal | मराठा समाजाला आरक्षण देणारच! या मंत्र्याने दिली ग्वाही 
sakal

बोलून बातमी शोधा

minister hasan mushrif comment on maratha reservation

महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही

मराठा समाजाला आरक्षण देणारच! या मंत्र्याने दिली ग्वाही 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्यापासून राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमिवर एका मंत्र्याने मराठा आरक्षणाबाबत महत्वाची वक्तव्य केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘महाआघाडी सरकार सत्तेवर आले त्यावेळी चंद्रकांत पाटील, नारायण राणे आणि विनायक मेटे हे मराठा आरक्षणाचे सुप्रिम कोर्टात हे होईल, सुप्रिम कोर्टात ते होईल, असे एका सुरात बोलत होते. त्यावेळीच आमच्या लक्षात आले होते की, मराठा आरक्षणामध्ये गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तरीही, फडणवीस सरकाने जे वकील नियुक्त केले होते तेच वकील आम्ही दिले. तरीही त्याला स्थगिती मिळावी, हे आश्‍चर्य करण्यासारखे आहे. मराठा समाज आरक्षणामध्ये कोणीही राजकारण आणू नये. सध्या अध्यादेश काढण्याचे काम सुरु आहे. तेही होईल. पण राजकारण न करता या समाजाला न्याय देण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे.’’

हे पण वाचा -  आण्णा तुम्ही जा... मायला, बारक्‍याला सांभाळा

 मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहू. कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही मोजायला तयार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

हे पण वाचा - खासदार संभाजीराजे यांनी तमाम खासदारांना केले हे आवाहन

संपादन - धनाजी सुर्वे