हरवलेला मुलगा चार तासांत आईच्या स्वाधीन 

missing boy was handed over to his mother in four hours
missing boy was handed over to his mother in four hours
Updated on

कंदलगाव (कोल्हापूर)- वेळ सकाळी 8.30ची, चेहरा रडकुंडी आणि घाबरलेल्या आवस्थेत एक सात वर्षाचा मुलगा पाचगाव शांतीनगर येथील दत्तात्रय जांभळे यांच्या दुकाना शेजारी उभा होता. खूप वेळ घाबरलेल्या मुलास जांभळे यांनी जवळ घेऊन त्याला धीर दिला व त्याची चौकशी केली. मात्र त्या मुलाला भीतीमुळे काहीच बोलता येत नव्हते.

जांभळे यांनी गावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी व उपसरपंच विष्णू डवरी यांना कल्पना देऊन त्या मुलास त्यांच्याकडे सोपविले. कांडेकरी, डवरी व संजय पाटील यांनी सुमारे चार तास गावातील गल्ली, बोळात फिरून त्या मुलाच्या नातेवायिकांचा शोध घेतला. मात्र त्यांना अपयश आले. काही वेळाने त्यांनी त्या मुलास घेऊन थेट सीसीटीव्ही केंद्र गाठले व सर्व फुटेज तपासले तरीही पत्ता सापडला नाही.

गावातील एका मिस्त्रीने त्याच्या नातलगांचा पत्ता दिला व त्या पत्यावर जाऊन सुटकेचा श्वास सोडून त्या हरवलेल्या मुलास त्याच्या आईच्या स्वाधीन केले.

चार तास गल्ली, बोळ पालथे घालून हरवलेल्या मुलास त्याच्या आईच्या स्वाधीन केल्याबद्दल माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, उपसरपंच विष्णू डवरी, संजय पाटील, दत्तात्रय जांभळे यांचे पाचगाव परिसरात कौतूक होत आहे.
 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com