esakal | ‘मी एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा फडकावणारच! आत्मविश्‍वासाने कस्तुरी सावेकरने  सर्वोच्च हिमशिखर केले सर
sakal

बोलून बातमी शोधा

Mission Everest complete Kasturi Savekar Island kolhapur marathi news

‘मी एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा फडकावणारच’ असा दुर्दम्य आत्मविश्‍वास जागविताना अनेक अडचणींवर मात करीत कस्तुरीच्या मोहिमेचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे.

‘मी एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा फडकावणारच! आत्मविश्‍वासाने कस्तुरी सावेकरने  सर्वोच्च हिमशिखर केले सर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरकन्या कस्तुरी सावेकरने जगातील सर्वोच्च हिमशिखर सर करण्यासाठी कूच केली असून, आज तिने या मोहिमेतील महत्त्वाच्या आयलॅंड पीकचे समीट केले. वीस हजार ३०५ फुटांवरील शिखर तिने यानिमित्त सर केले. काल (ता. ६) रात्री दोनच्या सुमारास तिने आयलॅंड पीक चढाईला प्रारंभ केला. आज सकाळी पावणेबाराला तिचे समीट झाले आणि सायंकाळी साडेसातला ती बेस कॅम्पला पोचली. 

‘मी एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा फडकावणारच’ असा दुर्दम्य आत्मविश्‍वास जागविताना अनेक अडचणींवर मात करीत कस्तुरीच्या मोहिमेचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. तिच्या ‘मिशन एव्हरेस्ट’चा प्रारंभ गेल्या वर्षीच्या जानेवारीतच झाला. मार्चमध्येच ती मोहिमेवर जाणार होती; पण लॉकडाउनमुळे जगच ठप्प झाले आणि तिची मोहीमही थांबली. 

हेही वाचा- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मुक्तसंचार ठरतोय डोकेदुखी; इचलकरंजी प्रशासनाला नाकेनऊ

लॉकडाउन काळातही तिचा रोजचा सात तासांचा सराव सुरूच राहिला. ती पुन्हा मोहिमेसाठी सज्ज झाली आणि गेल्या महिन्यात नेपाळला रवाना झाली. पहिलीच टीम कस्तुरी ज्या टीममधून एव्हरेस्ट सर करण्यासाठी पुढे सरसावली आहे, ती यंदाच्या हंगामातील पहिलीच टीम आहे. पाच जणांच्या या टीममधील कस्तुरीसह फक्त दोघांनीच आयलॅंड पीक समीट केले.

संपादन- अर्चना बनगे