esakal | कोरोना रिपोर्टची अशीही गल्लत...  खासगीत पॉझिटिव्ह, सरकारी तपासणीत आला निगेटीव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Misunderstanding About Corona Report Kolhapur Marathi News

कौलगे येथील पत्ता दिलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल खासगी प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आला होता. 15 मे रोजी मुंबईहून आल्यानंतर त्यांनी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिला होता.

कोरोना रिपोर्टची अशीही गल्लत...  खासगीत पॉझिटिव्ह, सरकारी तपासणीत आला निगेटीव्ह 

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : कौलगे येथील पत्ता दिलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल खासगी प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आला होता. 15 मे रोजी मुंबईहून आल्यानंतर त्यांनी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिला होता.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी शेंद्री येथील सरकारी कोव्हीड केंद्रावरही स्वॅब दिला होता. हा सरकारी अहवाल आज सायंकाळी आला. तो निगेटीव्ह असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी दिली. 

दरम्यान, गडहिंग्लज तालुक्‍यातील 409 जणांचे अहवाल आज निगेटीव्ह आले असून शहरासह तालुक्‍याला ही बाब दिलासादायक अशी आहे. येथील शेंद्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात उभारण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये 13 मेपासून पाठविलेल्या स्वॅब पैकी आज निगेटीव्ह अहवाल आले आहेत.

आतापर्यंत तालुक्‍यात कळवीकट्टे, काळामवाडी, भडगाव, यमेहट्टी या चार गावात पाच कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. हे सर्व मुंबईहून गावाकडे परतलेले आहेत. यामुळे तालुक्‍यात भितीचे वातावरण पसरले आहे. सर्वत्र कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना गडहिंग्लज तालुक्‍यातील आज 409 इतक्‍या मोठ्या संख्येने आलेल्या निगेटीव्ह अहवालाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अद्यापी बऱ्याच स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत.