मिश्र खत तयार आहे. मात्र शेतकऱ्याना या कारणासाठी मिळत नाही. जाणून घ्या कोणते आहे कारण

 Mixed manure is ready. But farmers do not get it for this reason. Find out which is the reason
Mixed manure is ready. But farmers do not get it for this reason. Find out which is the reason

कोल्हापूर : जिल्ह्यात मिश्रखतांची किंवा दाणेदार खतांमधील योग्य ते आणि आवश्‍यक घटक आहेत किंवा नाही, याची पडताळणी करण्यासाठी घेतलेल्या नमुन्याचे अहवाल पंधरा ते वीस दिवस दिले जात नाही. त्यामुळे मिश्रखत आणि दाणेदार खत विक्रीवर मर्यादा येत आहे. मागणी असूनही गोदामामधील अशी 10 ते 12 हजार टन खते विक्री पडून आहेत. त्यामुळे खतांमधील घटक तपासणीचे नमुन्याचे तत्काळ द्यावेत, अशी मागणी संघाकडून होत आहे. 
जिल्ह्यात भात, भुईमूग, सोयाबीन पिकाला मिश्रखत व दाणेदार खतांचा डोस दिला जातो. त्यामुळे भात कोळपणीला आल्यानंतर लोकांकडून मिश्रखत व दाणेदार खतांची मागणी वाढते. जिल्ह्यात खरेदी-विक्री संघाकडून अशा खतांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. शेतकरी संघामध्ये 2000 टन मिश्र व दाणेदार खत मागणी असून केवळ अहवाल आलेला नाही. खताची मोठी मागणी जिल्ह्यात आहे. मात्र, या खतांचे नुमने तपासणीसाठी पंधरा ते वीस दिवस उशीर होत आहेत. वास्तविक एखाद्या खतांचा घटक तपासणी अहवाल घेतल्यानंतर तो दोन ते तीन दिवसांत अपेक्षित आहे. पण, पंधरा ते वीस दिवस उशीर होत असेल्याने खतांच्या थप्या गोदामामध्येच पडून असतात, पण विक्री करता येत नाही. खतांचा डोस देण्यासाठी पोषक वातावरण आहे. सध्या अपेक्षित खत नसल्याने शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करावा लागत आहे. 

मिश्रखत आणि दाणेदार खतांची चांगली मागणी आहे, पण खतांच्या तपासणी अहवाल वेळेत मिळत नाहीत. हे अहवाल वेळेत मिळाले तर शेतकऱ्यांना शेतकरी संघाची अपेक्षित मिश्र आणि दाणेदार खतांचा पुरवठा करता येईल. 
जी. डी. पाटील, अध्यक्ष, शेतकरी सहकारी संघ, कोल्हापूर.  

संपादन - यशवंत केसरकर
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com