esakal | शिक्षकांनी गुणवत्तेत तडजोड करू नये : चंद्रकांत जाधव

बोलून बातमी शोधा

MLA chandrakant patil said event in kolhapur also ruturaj patil present}

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कार देण्याची वेगळी व्यवस्था निर्माण करावी

शिक्षकांनी गुणवत्तेत तडजोड करू नये : चंद्रकांत जाधव
sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : शिक्षक हा देशाचा कणा असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कार देण्याची वेगळी व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज येथे केले. कुडित्रे (ता. करवीर) येथील गुरुवर्य डी. डी. असगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टतर्फे आयोजित गुरूवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डी. डी. आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.

जाधव म्हणाले, 'समाज घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. विद्यार्थ्यांना इतरांना बरोबर घेऊन कसे जावे, त्याचे शिक्षण त्यांनी द्यायला हवे. पुढील पिढी शिक्षणातून घडणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी गुणवत्तेत कमी करता कामा नये.' आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,'डी. डी. आसगावकर यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्यांची पुण्याई मोठी असल्याने प्रा. जयंत आसगावकर आमदार झाले. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आसगावकर कुटुंब कमी पडलेले नाही.'

हेही वाचा - रस्तेकामांमुळे 63 खाणींना परवानगी ; जानेवारी अखेर 45 कोटी वसूल -

यावेळी ना. बा. एज्युकेशन सोसायटी, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल व बळवंतराव नारायणराव सरनोबत ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सीमा सांगरुळकर, खोतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सागर चुडाप्पा, पार्वती शंकर विद्यालयातील शिक्षक बाबुराव पाटील, उषाराजे हायस्कूलचे सागर वातकर, न्यू इंग्लिश स्कूलचे सुधीर कांबळे, महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या गीता मुरकुटे, विलासराव शामराव तळप- पाटील माध्यमिक विद्यालयाचे बाबासाहेब कुंभार, न्यू इंग्लिश स्कूलचे शिवानंद घस्ती, काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे अमित शिंत्रे, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्वाती पंडित, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे विलास आरेकर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अनिलकुमार गुरव व बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी अभिजित गायकवाड यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. शिक्षक मच्छिंद्र कुंभार व ओंकार लंबे यांचा विशेष सत्कार झाला.

शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी ट्रस्टच्या वाटचालीचा आढावा घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत खाडे, बी. एन. कुलकर्णी, केशवराव जाधव, डी. जी. खाडे, इंदूबाई आसगावकर उपस्थित होते. राजेंद्रकुमार गोंधळी व निता पोवार यांनी सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा - राऊत यांनी बेताल वक्तव्ये करू नये अन्यथा जशास तसे उत्तर देवू

संपादन - स्नेहल कदम