सातार्डेतील सावकारावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आपटी (कोल्हापूर) ः सहकार विभागाच्या अवैध सावकारी तपासणी पथकाने 28 जानेवारीला पन्हाळा तालुक्‍यातील सातार्डे येथील खासगी सावकार विनायक लाड याच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांबाबत योग्य खुलासा न केल्याने काल जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी लाड याच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज चंद्रकांत इंगवले यांनी विनायक लाड याच्यावर पन्हाळा पोलिसात गुन्हा नोंद केला.

अधिक माहिती अशी, खासगी सावकारीविरोधात तानाजी सदाशिव चौगले (रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाच्या अवैध सावकारी तपासणी पथकाने 28 जानेवारीला सातार्डे येथील खाजगी सावकार लाड याच्या घराची झडती घेतली होती. झडतीत लाड याच्याकडे बेकायदेशीर सावकारी संबंधातील दस्तावेज सापडले होते. त्यामध्ये सापडलेल्या दोन खरेदी दस्त, एक बॉंड व भिशीची वही याच्याबाबत लाड यांने योग्य खुलासा केला नव्हता. त्यामुळे लाड सावकारी करीत असल्याची खात्री झाल्याने चंद्रकांत इंगवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नुसार पन्हाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस नाईक पोवार अधिक तपास करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money lender crime