कोल्हापूरकरांची चिंता वाढविणारी बातमी : काल एकाच दिवसात सापडले कोरोनाचे तब्बल एवढे रुग्ण

more than corona patient 939  found and 19 patient death situation in Kolhapur is worrisome
more than corona patient 939 found and 19 patient death situation in Kolhapur is worrisome

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. यात बुधवारी बारा ते गुरुवारी रात्री बारापर्यंत ९३९ इतके उच्चांकी नवे बाधित सापडले आहेत, तर याच कालावधीत जवळपास ३५९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. १९ बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र काही भागात जरूर आहे. यात गगनबावडा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी तालुक्‍यात बाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले तालुक्‍यात बाधितांचे प्रमाण वाढते आहे. या तालुक्‍यातील बहुतांशी रूग्ण शहरात उपचाराला येत आहेत. यात गेल्या तीन दिवसात शहरात सातशेपेक्षा अधिक संख्येने बाधित सापडले आहेत. या सर्वांवर शहरातील सहा कोविड सेंटरसह सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या बाधितात एकूण १२६ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील १४ शासकीय रूग्णालयात एक हजार २०० व्यक्तींचे नवीन स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

हेही वाचा- अखेर 10 तासांनी आजोबांवर झाले अंत्यसंस्कार :  पुन्हा एकदा कोल्हापूरात माणुसकीचे दर्शन

एकूण कोरोनाग्रस्त --- २६,७४४
एकूण कोरोनामुक्त--- १६,७८३
मृत्यू ------------------ ८०४

तालुकानिहाय बाधित 
कोल्हापूर शहर १७८, इचलकरंजी ८१, शिरोळ ४५, करवीर ९८, हातकणंगले ९०, कागल ४४, आजरा ५० , पन्हाळा २४ , गडहिंग्लज ३६ अन्य तालुक्‍यात ३ ते १५ बाधित आढळलेले आहेत.

कोल्हापूरची स्थिती चिंताजनक

 कोल्हापुरातील गेल्या तीन महिन्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिंता व्यक्त केली. जिल्ह्याला कोरोना लढ्यात काही अडचण असल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन सहकार्य करेल, मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूरसह सातारा, सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. 

त्यात त्यांनी कोल्हापुरविषयी चिंता व्यक्त केली. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे शक्‍य आहे. येथील सर्वसामान्यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, त्याचपद्धतीने कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्‍यक असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.


ते म्हणाले, ‘‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या प्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होवू देवू नका. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी येईल. पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. एका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. ‘चेस द व्हायरस’ मोहीम गांभीर्याने राबवा. कंटेन्टमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देवून कुटूंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबवा.’’


ते म्हणाले, ‘‘घरातील काही आजार आहेत का?, न्युमोनियासदृश्‍य लक्षणे आहेत का? बाहेरून कोणी आले काय? मास्क व इतर शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते काय, याची माहिती सर्व्हेक्षणात विचारा. केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास, काही कमतरता भासल्यास संपूर्ण सहकार्य करू; मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका. सुविधा उभारण्यात मदत करू. निधीही देवू. या सुविधा वापरायची वेळ येवू देऊ नका. जबाबदारीने काम करा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत विनंती होत आहेत; मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे.’’

चारशे ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता
कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी तीनशे आयसीयू आणि चारशे ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता आहे. त्याबाबतचा प्रस्तावही पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आढाव्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com