काळभैरी यात्रेला अडीच लाखाहून अधिक भाविक

More Than Two And A Half Lakh Devotees On The Kalabhari Yatra Kolhapur Marathi News
More Than Two And A Half Lakh Devotees On The Kalabhari Yatra Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : सीमा भागाचे श्रद्धास्थान आणि येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाची वार्षिक यात्रा आज पारंपारिक आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. काळभैरी डोंगरावर जणू भक्तांचाच मेळा भरला होता. पहाटे पासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले. रात्री उशीरापर्यंत ही गर्दी टिकून होती. काळभैरी.. बाळभैरी ..भैरीच्या नावानं चांगभलं हा भाविकांचा गजर दिवसभर सुरू होता. यात्रेच्या निमित्ताने सुमारे तीन कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. पोलिसांनी राबविलेले वाहतूकीचे नियोजन यशस्वी ठरले. 

येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगर कपारीतील मंदिरात श्री. काळभैरवाची मुख्य यात्रा भरते. प्रथेप्रमाणे रात्री बारा वाजता प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय पूजा झाली. मंदिराचे पुजारी विठ्ठल गुरव, रवींद्र गुरव यांनी आकर्षक पुजा बांधली होती. पहाटे पाचला आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रांग लागली. दर्शन सुलभ व्हावे यासाठी अनिरुद्ध बापू केंद्राचे स्वयंसेवक, व्हाईट आर्मीचे जवान, पोलिस, होमगार्ड यांची अनमोल मदत झाली. यंदा थेट दर्शन पद्धत बंद होती. त्यामुळेही भाविकांना नवीन सभामंडपामुळे सहज दर्शन घेता आले. 

यात्रास्थळी जाण्यासाठी येथील एसटी आगाराने 25 बसगाड्यांची सोय केली होती. प्रत्येक दहा मिनिटाला गाडी सोडली जात होती. यात्रास्थळीही तात्पुरते स्थानक उभारण्यात आले होते. बसबरोबरच ट्रॅक्‍टर, चारचाकी, दूचाकी आणि बैलगाडीतून यात्रेला जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. बड्याचीवाडीत चारचाकी आणि दूचाकीचे पार्किंग करण्यात आले होते. परिणामी शेंद्री तलावाच्या पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी झाली नाही.

ज्येष्ठ आणि लहान मुलांना या पद्धतीमुळे थोडा त्रास झाला असला तरी लाखोंची उपस्थिती असणाऱ्या या यात्रेत सुरक्षितपणा वाढला. यात्रेसाठी बड्याचीवाडी मार्गे एकेरी मार्ग होता. परत येताना मात्र एमआयडीसी, शेंद्री माळ, मार्केट यार्ड येथून शहरात यावे लागत होते. त्यामुळे दोन्ही मार्गावर वाहतूक सुटसुटीत सुरू होती. कोल्हापूरला जाणारी वाहतूक शेंद्री मार्गे, तर कोल्हापुरातून येणारी वाहतूक वडरगे मार्गे वळविण्याचे नियोजनही उपयुक्त ठरले. खेळणी, खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर दिवसभर यात्रेकरूंची गर्दी दिसली. लहान मुलांनी पिप्पाणीच्या आवाजाने यात्रास्थळ दुमदूमून गेले. शहरासह लगतच्या बड्याचीवाडी (ता.गडहिंग्लज), बहिरेवाडी (ता.आजरा), हडलगे (ता. चिक्कोडी) येथेही काळभैरवाची यात्रा उत्साहात साजरी झाली. या चारही ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून सुमारे तीन कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. 

प्रशासनाच्या नियोजनाला यश 
काल रात्रीपासूनच यात्रा सुरक्षितरित्या पार पडावी यासाठी पोलिस विभागाचे दहा अधिकारी आणि दीडशेहून अधिक कर्मचारी मंदिर परिसरात तैनात होते. त्याचबरोबर मंदिर जीर्णोद्धार उपसमिती, महावितरण, आरोग्य,वनविभाग, बड्याचीवाडी ग्रामपंचायत, अनिरुद्ध बापू केंद्राचे स्वयंसेवक, व्हाईट आर्मी यांच्यासह काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यात्रेकरुंना दिवसभर मदत करीत होते. आरोग्य विभागासह केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे वैद्यकीय पथक यात्रास्थळी कार्यरत होते. टू व्हीलर मॅकेनिक संघटनेतर्फे मोफत दुरुस्तीसह पंक्‍चर काढण्याची सोय यंदाही कायम होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com