esakal | कोणी मैदान देता, का मैदान? आयोजकांवर आली वेळ शोधण्याची

बोलून बातमी शोधा

Most of the matches are being played Rajaram College grounds sports marathi news}

शहरात मैदाने असून बिनकामाची ; क्रिकेटसाठी तालुक्‍यांकडे धाव 

कोणी मैदान देता, का मैदान? आयोजकांवर आली वेळ शोधण्याची
sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात क्रिकेट खेळता येतील अशी 11 मैदाने उपलब्ध असूनही स्पर्धा घेण्यासाठी मैदाने शोधण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. नावाजलेल्या स्पर्धांसह कोल्हापूर डिस्ट्रीक्‍ट क्रिकेट असोसिएशन स्पर्धा घेण्यासाठी इचलकरंजी, कागल येथील मैदानांचा आधार घेत आहे. 


कोल्हापुरात उपलब्ध मैदानांपैकी अनेक मैदाने नादुरुस्त आहेत.जिल्हाभरात शेकडो संघ आणि अनेक स्पर्धा आयोजक असूनही निव्वळ मैदानाअभावी खेळ वाढत नाही आहे. शहर परिसरात असणाऱ्या मैदानांत शाहूपुरी जिमखाना, राजाराम कॉलेज मैदान, शिवाजी विद्यापीठ मैदान, छत्रपती शाहू मैदान (कागल), छत्रपती राजाराम स्टेडियम ( इचलकरंजी ), छत्रपती शाहू स्टेडियम या निवडक मैदानावर स्पर्धात्मक खेळपट्टी उपलब्ध आहे. असे असले तरीही राजाराम कॉलेज मैदान, शाहूपुरी जिमखाना ही शहरातील दोनच मैदाने उपलब्ध आहेत. यामुळे आयोजकांना आणि खेळाडूंना धावपळ करावी लागते. कोरोनाच्या कारणामुळे वर्षभर हंगाम होऊ न शकला काही त्यामुळे महत्वाचे सामने पूर्ण करण्याचे आव्हान "केडीसीए'वर आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक सामने इचलकरंजी ,कागल व राजाराम कॉलेज मैदानावर होत आहेत. 

सामन्यांसाठी आयोजकांचीकसरत 
शहरात असणाऱ्या इतर मैदानाची स्थिती गंभीर बाब आहे. मैदानाच्या खेळपट्या या लेदर बॉलवर खेळण्यासाठी धोकादायक आहेत. तसेच साईड स्क्रीन, बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम सारख्या गरजेच्या सुविधा नसल्यामुळे स्थानिक सामने खेळवण्यासाठी आयोजकांना कसरत करावी लागते. 

दृष्टीक्षेपात हंगाम 
*एका हंगामात 30 हून अधिक स्पर्धा आणि 500 हून अधिक सामने. 
* शहरात दोनच मैदाने उपलब्ध 


अनेक आयोजकांना स्पर्धेसाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध मैदाने अपुरी आहेत. तर उर्वरित मैदानावर खेळपट्टी नाही आहे. किमान सराव करावा म्हटले तरीही खेळपट्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. आयोजक कोल्हापूरला पसंद देतात मात्र हीच परिस्थिती राहिल्यास मिळणारी पसंदी इतिहास होईल. 
- राजू पठाण, प्रशिक्षक व स्पर्धा आयोजक.  

संपादन- अर्चना बनगे