कोल्हापूर जिल्ह्यात 'या' बस फेरीला मिळतोय सर्वाधिक प्रतिसाद

Most Rounds On Gadhinglaj-Kolhapur Route In The District Kolhapur Marathi News
Most Rounds On Gadhinglaj-Kolhapur Route In The District Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील आगाराच्या गडहिंग्लज-कोल्हापूर या बसला जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे हा मार्ग जिल्हयात अव्वल ठरला आहे. हिटणी मार्गावरही प्रवासासाठी गर्दी आहे. कोरोनाचे ग्रामीण भागात सापडणारे रुग्ण स्थानिक फेऱ्यांना अडथळा ठरत आहेत. माल वाहतुकीलाही व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

लॉकडाऊननंतर गेल्या महिनाभरापासून एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या. पहिल्या टप्यात केवळ आठवडाभर कोल्हापूर मार्गावरच बसफेरी सुरु झाली. त्यातही सीमा भागातून प्रवासास बंदी असल्याने माद्याळ, कापशी, कागल असा वळसा घालून ही फेरी सुरू आहे. मुळातच या आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारा कोल्हापूर मार्ग आहे. खासकरुन कोल्हापूर-नॉनस्टॉप बसफेरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. पूर्वी दिवसभरात 27 फेऱ्यातून सुमारे दीड लाखांचे उत्पन्न आगाराला मिळत होते. आताही याच मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद आहे. जिल्ह्यात हीच फेरी अव्वल ठरली आहे. 

या आगाराला दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारा मार्ग म्हणजे संकेश्‍वर होय. आंतरराज्य बंदी असल्याने येथील बस केवळ हिटणी नाक्‍यापर्यंत सध्या सुरू आहे. रोज बारा फेऱ्या होत आहेत. या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगली आहे. हलकर्णी, दुंडगे या ठिकाणी कोरोनारुग्ण सापडल्याने काही फेऱ्यांना अडथळे निर्माण झाले. हसूरचंपूला हेब्बाळ मार्गे बस सोडण्यात आली आहे. नूल आणि नेसरी मार्गावर प्रत्येकी सहा फेऱ्या सुरू आहेत. आजऱ्याला 3, तर करंबळीला सहाफेऱ्या आहेत. गारगोटीला दिवसभरातून दोन फेऱ्या होत आहेत. माल वाहतुकीलाही गेल्या पंधरा दिवसात चांगला प्रतिसाद आहे. येथील व्यापाऱ्यांनी सांगली, इस्लामपूर, सांगोला या ठिकाणी एस.टीच्या मदतीने साहित्य नेले आहे. 

माल वाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद
माल वाहतुकीसाठी पहिल्या टप्यात व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. स्थानिक उद्योजकांशी संपर्क साधून एस.टीतून माल वाहतूक करण्यासाठी विनंती केली आहे. आगारात दोन बस या मालवाहतुकीसाठी राखीव ठेवल्या आहेत. 
- एस. एस. मनगुतकर, आगार व्यवस्थापक, गडहिंग्लज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com