रात्रपाळी करून तो  सकाळी घरी आला दरवाजा उघडून पत्नी मुलाला बघताच बसला धक्का

Mother and seven month ago baby Suicide case kagal five star colony area kolhapur
Mother and seven month ago baby Suicide case kagal five star colony area kolhapur
Updated on

कागल (कोल्हापूर)  : सात महिन्यांच्या तान्हुल्यासह साडीने गळफास लावून घेऊन एका परप्रांतीय महिलेने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी सव्वासात वाजता हा प्रकार उघडकीस आला. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेट्रो टेक्‍स्टाईल पार्कमधील कामगार चाळीत हा प्रकार घडला आहे. संबरी लक्ष्मीधर मरंडी (वय २४, मूळ ओडिशा) व मुलगा भगवान (७ महिने) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 

ओडिसा येथील लक्ष्मीधर भगवान मरंडी मेट्रो टेक्‍स्टाईल पार्कमधील सूत गिरणीत कामाला आहेत. मिलच्या शेजारीच कामगारांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यातील एका खोलीत लक्ष्मीधर आपली पत्नी संबारी आणि मुलगा भगवान यांच्यासह राहत आहेत. रात्री अकरा वाजता रात्रपाळी असल्याने ते सुतगिरणीत कामावर गेले होते. ते, सकाळी सव्वासातला कामावरून घरी आले. घराचा दरवाजाचा आतून बंद होता. त्यांनी पत्नीला हाक मारली; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजारील कामगारांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला.

घरात गेल्यानंतर पत्नीने मुलासह साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती कागल आणि गोकुळ शिरगाव पोलिसांना देण्यात आली. 
पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक फौजदार अशोक पाटील, राम डावाळे, मनीषा ढेकळे, महादेव बिरांजे, महेश पाटील आणि मोहन माटुंगे यांनी पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, करवीरचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com