हेरे पंचक्रोशी ग्रामस्थांकडून रास्ता रोको 

Movement By Villagers In Here Area Kolhapur Marathi News
Movement By Villagers In Here Area Kolhapur Marathi News

चंदगड : चंदगड- कोदाळी मार्गावर मोहनतळे ते कोदाळी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी हेरे (ता. चंदगड) पंचक्रोशी ग्रामस्थांतर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हेरे येथे सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनात नागरीकांनी प्रसाशनाच्या कारभारावर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय सासणे यांनी आंदोलनस्थळी येऊन 3 फेब्रूवारीपासून कामाला सुरवात करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

या रस्त्याला मंजूरी मिळून दोन वर्षे झाली. एका कंपनीला याचा ठेका मिळाला आहे. रस्त्यासाठी दुतर्फा गर्द वनराई तोडली आहे. हे काम करताना रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. परंतु त्या कामाकडे मात्र दूर्लक्ष आहे. याचा राग यावेळी व्यक्त करण्यात आला. शंकर चव्हाण, अंकुश गवस, बंडोपंत पाटील, चंद्रकांत पाटकर, आप्पाजी गावडे, विशाल बल्लाळ यांनी आंदोलकांसमोर मनोगते व्यक्त केली. रस्त्याची दुर्दशा झालेली असताना गेली दोन वर्षे पंचक्रोशीतील वाहनधारक त्याला तोंड देत आहेत.

संबंधीत ठेकेदाराला याचे काहीच सोयरसुतक नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. उप अभियंता सासणे, सहाय्यक अभियंता इफ्तीकार मुल्ला यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन म्हणणे ऐकून घेतले. ठेकेदार कंपनीचा सुपरवायझर वैभव गोडसे यांना बोलावून घेतले. जोपर्यंत त्यांच्याकडून काम सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर 3 फेब्रूवारी पासून काम सुरु करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

या तारखेला काम सुरु न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. सरपंच पंकज तेलंग, सुधाकर गावडे, तुकाराम धुरी, भरमू धुरी, सत्यजित सावंत भोसले, राजीव पाटील, राजू पाटील, आप्पाजी गावडे, मारुती जांबरेकर, महादेव गावडे, विवेक पाटील, ज्ञानेश्‍वर शिरोडकर, लक्ष्मण मोरे, रामचंद्र मोरे, अशोक दळवी, अजय जेलुगडेकर, नंदू जेलुगडेकर, नागोजी पाटील, संदीप पिळणकर, सचिन पाटील यांच्यासह हेरे, गुडवळे, खालसा सावर्डे, शिप्पूर, नांदवडे, पार्ले, मोटणवाडी, पाटणे, कळसगादे, इसापूर, पारगड, वाघोत्रे गावातील नागरीक सहभागी झाले होते. 

कासव गतीने काम 
चंदगड तालुक्‍याच्या हद्दीत मलगेवाडी पासून या रस्त्याच्या कामाला सुरवात होते. गेल्या वर्षी पासून कामाला सुरवात झाली असली तरी कासव गती पाहता हे काम कधी पूर्ण होणार असा नागरीकांचा प्रश्‍न आहे. कंपनीच्या कामाबाबत नागरीकांत प्रचंड नाराजी आहे. 

संपादन -सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com