
कोल्हापूर : राज्य शासनाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून (ता. 23) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी सुरू झाली आहे. शाळा सुरू होण्यास केवळ चार दिवस राहिले असल्याने शिक्षकांची स्वॅबची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, सध्या दररोज एक हजार शिक्षकांची स्वब तपासणी सुरू आहे. वेळेनुसार ती आणखी वाढविण्याचे नियोजन आहे.
प्राथमिक शिक्षकांची स्वॅब तपासणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्याने या शाळाही सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे आठ महिने शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय काढला. मात्र अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याचे दिसते. राज्यातही आता कोरोनाचे संकट कमी झाले असल्याने 23 पासून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. हे वर्ग सुरू करताना काय खबरदारी घ्यायची?, या सविस्तर मार्गदर्शन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पालकांची संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येणार आहेत. दरम्यान, शाळा सुरू करताना विविध घटकांवर काही जबाबदारी दिल्या आहेत. यात शाळेत दररोज सॅनिटायझरचा वापर, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर तपासणी अत्यावश्यक आहे.
दृष्टिक्षेपात
*माध्यमिक शाळा ( शहरासह जिल्ह्यात) - 968
*एकूण विद्यार्थी --------------------12 हजार 641
*शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ------4 हजार
-प्राथमिक शाळा- (शहरासह जिल्ह्यात) - 1977
*एकूण विद्यार्थी---------------------1 लाख 80 हजार
एकूण शिक्षक-----------------------6500
अशी होणार प्रक्रिया
*पालकांचे प्रमाणपत्र आवश्यक
*दररोज 4 तास शाळा
* 50 टक्के उपस्थिती
* एक आड एक विद्यार्थी बैठक
*विद्यार्थ्यांना मास्क अत्यावश्यक
*सोशल डिस्टन्सिंगचे आवश्यक
*शाळा, वर्ग सॅनिटायझेशन
शाळा सोमवारी (ता. 23) सुरू होण्यास काही अडचण नाही. फक्त पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वॅब घेतले जात आहेत. याबाबत जिल्हा व राज्य स्तरावरुन आदेश काढले आहेत. मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून शाळा सुरू करण्याबाबत सर्व तयारी करून घेतली आहे.
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी.
सध्या 12 तालुक्यात शिक्षकांचे स्वॅब घेण्याची व्यवस्था केली आहे. ज्यांना लक्षणे आहेत त्यांना तीन दिवस घरातच अलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वॅबची संख्या वाढवण्याचेही नियोजन सुरू आहे.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
प्राथमिक शाळेतील शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान घेण्याचे आदेश दिले होते. मात्र सध्या माध्यमिकच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर प्राथमिकच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी होईल. ही चाचणी 30 नोव्हेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे.
- बी. एम. कासार, प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.