"माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका , आपण लढाई नक्की जिंकूंच"!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच  एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली आहे.

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून  माझ्या निडर वाघांनो तुम्हीच  असे हातबल होऊन आत्मबलिदाना सारखे मार्ग स्वीकारू नका असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.या घटनेनंतर त्यांनी ट्विट केले आहे. 
 

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच  एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली आहे. विवेक कल्याण राहाडे असे या मुलाचे नाव. मला जिवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे मी आत्ताच नीट ही मेडिकलची परीक्षा दिली.  मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा कुठेच नंबर लागणार नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेट मध्ये शिकवण्याची ऐकत नाही त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी  मेल्याने तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाग येईल आणि मग माझे मरण सार्थक होईल असे लिहून विवेकने आपले आयुष्य संपविले आहे. यावर खासदार संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे  या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली वाहिली.

 

याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी 
 समाजाला उद्देशून केलेल्या आवाहनात म्हंटले आहे की , एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!  माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.  सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.
 
  विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.  समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!

 

हेही वाचा- कुस्ती सुटली तरी गड्याची तांबड्या मातीशी नाळ कायम ; सोशल मीडियाद्वारे करतोय कुस्तीचा प्रचार -

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje tweet for viviek rahane case