
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा "नई तालीम' हा शैक्षणिक विचार आता राज्यभरात पोचवला जाणार आहे. वर्तमानातही हा विचार
कसा उपयुक्त आहे आणि मुलांचे भावविश्व टिकविण्यासाठी त्याचा फायदा कसा होतो, याबाबतचा जागर त्यातून होणार आहे.
येथील ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर त्यासाठी आग्रही असून "नई तालीम' हे चित्र प्रदर्शन आणि "गांधी फॉर टुमारो' या पथनाट्याची संकल्पना त्यांचीच आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मवर्षानिमित्त हा उपक्रम होणार असून, विविध ठिकाणच्या प्रदर्शनानंतर वर्धा येथील "सेवाग्राम'मध्ये या उपक्रमाची सांगता होईल.
महात्मा गांधी यांनी "नई तालीम' हा शिक्षणविषयक विचार 1937 मध्ये सर्वात पहिल्यांदा मांडला. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या आहारी गेलेल्या भारतीय शिक्षणपद्धतीला पर्याय म्हणून त्यांनी हा विचार दिला. काही काळ या विचारावर शाळाही सुरु झाल्या; पण काळानुरूप त्या बंद पडल्या. 2005 मध्ये वर्धा येथील "सेवाग्राम'मध्ये "आनंद निकेतन' या शाळेत या विचारावर आधारित शिक्षणाला प्रारंभ झाला. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्री. हळदीकर यांनी रंगभूमीविषयक विविध कार्यशाळा घेतल्या. यानिमित्ताने त्यांनी या शैक्षणिक विचाराबद्दल विद्यार्थ्यांना काय वाटतो, याविषयीच्या भावना चित्र आणि लेखांच्या माध्यमातून जाणून घेतल्या. याच शाळेतील मुलांनी काढलेली चित्रे आणि लेखांचा प्रदर्शनात समावेश असतो.
मेकॉलेने जी शिक्षण व्यवस्था भारतात रूजवली. ती मुला-मुलींतील सर्जशीलता मारणारी आणि केवळ पोपटपंची कारकून निर्माण करणारी आहे. त्यामुळेच तर या पद्धतीला गांधीजींच्या "नई तालीम'ने पर्याय दिला होता. येत्या काळातही हा विचार अतिशय महत्वाचा असून, त्याची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने प्रदर्शनांचे आयोजन होणार असल्याचे हळदीकर यांनी सांगितले.
कौशल्याधारित शिक्षण
प्राथमिक शिक्षणात आरोग्य, स्वच्छता, आहारशास्त्राचा समावेश असावा, तर सर्व विषय शिकवताना ते विविध कौशल्याधारित असावेत, ही "नई तालीम'ची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळे याच संकल्पनेवर आधारित निवडक चित्रे व लेखांचा प्रदर्शनात समावेश असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.