नजमा भाभींच्या जगण्याला पणतीचा प्रकाश 

 Najma bhabhi's life is the light of decline
Najma bhabhi's life is the light of decline
Updated on: 

कोल्हापूर : दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा अन्‌ मिनमिणत्या दिव्याचा तेजोमय सण, पणती हेच सणाचं जणू प्रतीकच, याच प्रतिकाला हाताशी घेत 72 वर्षाच्या नजमा सय्यद जगण्यातला प्रकाश शोधत आहेत. महाद्वार रोडवर रस्त्याच्या कडेला 10 वर्षे पणत्यांच्या विक्रीतून चार पैसे जोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न गलबलून सोडणारा आहे. 
नजमा भाभींचे बालपण गरिबीतच गेलं. लग्न होऊन त्या शाहूपुरीत आल्या. पतीच्या सोबतीने अगरबत्तीचा कारखाना उभारला. संसार वेलीवर तीन फुलं उमलली. ती मोठी केली पण आनंदाचा संसार सुरु असतानाच 20 वर्षापूर्वी पतीचं निधन झाले. अन्‌ संसाराला घरघर लागली. मुलांच्या वाटा बदलल्या. पण नजमा भाभींनी स्वाभिमान सोडला नाही. 
महाद्वाररोडवर पणती, उटणे घेण्याची विनंती करताना काहीजण लांबूनच नकार देतात तर काही पणतींच्या किंमतींची चौकशी करत घासघीस करतात. तेव्हा त्या म्हणतात "काचेच्या चकमकीत दुकानातून आहे, त्या किमतीला वस्तू घेता, इथं माझ्या पोटाला पण दोन रुपये मिळू द्या, दहाला दोन आहेत. पण तुम्ही आलायसा माझ्याकडं तर घ्या दहाला तीन.' यावेळी मात्र समोरचा ग्राहक बरं द्या, आजी', असा होकार टाकतो. तेव्हा नजमा यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. दिवाळी, दसरा, गणपती उत्सव हे त्यांच्या आधाराचे सण. दिवाळीत पणती, उटणे विकणे. दसऱ्याला नवधान्य विकणं हे त्याचं काम, दिवसाल्या मिळणाऱ्या शंभर, दिडशे रुपयावर ते औषधाचा, रोजचा खर्च भागावतात. 

दिपावलीत "अली', रमजानमध्ये "राम' 
नजमा भाभी म्हणतात,"दिपावलीत "अली' आहे तर रमजानमध्ये "राम' आहे. हे सर्व सण उत्सव लोकांना आनंद देतात. माझ्या जगण्यालाही हे सणच आधार आहेत. आल्लाह कृपाळू आहे. अन्‌ आई अंबाबाईचा आशिर्वाद ही माझ्यावर आहे. म्हणून तर मी तिच्या दारात बसून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com