आणि हसन मुश्रीफ झाले भाऊक

NCP President Sharad Pawar birthday celebration memories for  Rural Development Minister Hasan Mushrif
NCP President Sharad Pawar birthday celebration memories for Rural Development Minister Hasan Mushrif

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ऐंशी वा वाढदिवस आज देशभरात साजरा होत आहे. कोल्हापुरात देखील शाहू सांस्कृतिक मंदिर येथून वाढदिवसा निमित्त व्हच्यूअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.   ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांच्याविषयी बोलत असताना यावेळी मुश्रीफ भाऊक झाले.


यावेळी ते म्हणाले,  मिरजेला जातीय दंगल झाली. यात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पराभूत झाले. मात्र मी प्रचंड मतांनी विजयी झालो. राज्यात सत्ताही आली. यावर बोलताना शरद पवार यांनी माझ्या विजयावर समाधान व्यक्त केले होते. आमचा एक अल्पसंख्यांक कार्यकर्ता हसन मुश्रीफ या निवडणुकीत विजयी झाला असल्याचा आनंद झाल्याचे पवार साहेबांनी सांगितले. या आठनणी जाग्या करत असताना  हसन मुश्रीफ भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले.त्यामुळे  संपूर्ण सभागृह देखील भाऊक झाले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com