The NCP will have to work hard to maintain its strength in the municipal elections
The NCP will have to work hard to maintain its strength in the municipal elections

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर  संख्याबळ टिकविण्यासाठी करावी लागणार कस 

कोल्हापूर  : महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कोअर कमिटी स्थापन करुन मोर्चेबांधणी सुरु केली आहे, मात्र अंतर्गत गटबाजीचे ग्रहण या पक्षाला लागले असून, ही गटबाजी संपवून पक्षाने एकसंधपणे निवडणूक लढविल्यास 30 जागा पक्षाला मिळविता येतील. 
राष्ट्रवादीचे नेते ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ राजकीय व्यूहरचनेत माहीर आहेत. राज्यात सत्ता असल्याने पक्षाला निवडणुकीत ताकदीने उतरता येणार आहे, मात्र पक्षातील गटबाजी दूर करण्याचेच या निवडणुकीत आव्हान आहे. महापालिकेत 10 वर्षांहून अधिक काळ दोन्ही कॉंग्रेसची सत्ता आहे. 
महापलिकेच्या 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 25 जागा निवडून आल्या होत्या. राष्ट्रीय कॉंग्रेससोबत आघाडी करून हा पक्ष सत्तेत आला. 2015 मध्ये मात्र या पक्षाच्या जागा घटल्या. राष्ट्रवादीतील अनेक महत्त्वाचे मोहरे भाजप आणि ताराराणी आघाडीत गेल्याने हे संख्याबळ घटले होते, तर काही ठिकाणी मोजक्‍या फरकाने पक्षाचे उमेदवार पराभूत झाले, परंतु 15 जागा निवडून येऊनही राष्ट्रवादीने सत्तेत समान वाटा मिळविला. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवकाला कोणते, ना कोणते पद मिळाले. पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांचा स्थायी सभापती निवडणुकीत पक्षातीलच दोन नगरसेवक फुटल्याने झालेला पराभव हा पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लागला होता. ऐनवेळी हा मोठा धक्का पक्षाला बसल्याने राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. 
पक्षाचे शहराध्यक्षपद सध्या आर. के. पोवार यांच्याकडे आहे. महापौरपदासाठी अखेरपर्यंत डावलल्याने आणि अखेरच्याक्षणी केवळ दीड, दोन महिनेच महापौरपदाची संधी मिळाल्याने माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर नाराज आहे. आदिल फरास यांचा सवता सुभा आहे. लाटकर आणि फरास यांच्यातही मतभेद आहेत. अजित राउत, उत्तम कोराणे, परिक्षित पन्हाळकर या शिवाजी पेठेतील कार्यकर्त्यांचा उपयोग पक्षाने करुन घ्यायला हवा, तर राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा पक्षाने कोअर कमिटीत समावेश केलेला नाही. या सर्वाचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्‍यता आहे. 

एकमेकाला धडा शिकविण्यात पक्षाचा विसर 
गटबाजीने ग्रासलेल्या शहर राष्ट्रवादीत हे मतभेद संपले, तरच पक्षाला या निवडणुकीत यश मिळेल. अन्यथा असलेला 15 सदस्यांही आकडा गाठता येणार नाही. पक्षातील अनेकजण यापूर्वीच कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आहेत. एकमेकाला धडा शिकविण्याच्या नादात पक्षाचा विसर सर्वांनाच पडला आहे. 


*राष्ट्रवादी नगरसेवक संख्या : 14 
* स्वीकृत नगरसेवक - 1 

*पाच वर्षात झाले 4 महापौर 
*- हसिना फरास 
* माधवी गवंडी 
*सरिता मोरे 
* सूरमंजिरी लाटकर 

इदरगंज पठार हा पर्यावर्णीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊनच उच्च न्यायालयाने येथे मानवी हस्तक्षेपाला मनाई केली आहे. असे असताना वन विभागाने येथे पर्यटनाचा प्रस्ताव बनवणे हे नियमबाह्य आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात अशी बरीच पठारे आहेत, जेथे वनविभाग पुष्प पर्यटनासाठी प्रस्ताव बनवू शकते. इदरगंजचे पठार मानवी हस्तक्षेप करणे योग्य नाही. 
- प्रा.डॉ.मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com