आत्महत्या मार्ग नव्हे, मानसिक बळ वाढवा

The need to increase mental strength
The need to increase mental strength
Updated on

कोल्हापूर : कुटुंबियांची भेट होत नाही, नोकरी गेली अन वाट्याला बेरोजगारी आली, कर्जाचा डोंगर झाला ते फेडायचे कसे ? म्हणून आत्महत्या, असे विदारक चित्र कोल्हापूर जिल्ह्यात समोर येत आहे. कोरोनाच्या संकटात मानसिक धैर्य खचल्याने आत्महत्येचा मार्ग समाजातील काही घटक अवलंबत असल्याचे दिसत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच मानसिक बळ वाढविण्याची गरज यातून स्पष्ट होत असल्याचे मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

लॉकडाऊनमुळे आईची भेट होत नाही. तिच्या भेटीसाठी गावी जाता येत नसल्याच्या कारणातून काल पाचगावातील युवतीने जीवनयात्रा संपवली. एकीकडे लॉकडाऊनमुळे कुटुंबियांना एकत्रित वेळ घालवता आला, असे सकारात्मक चित्र असले तरी आजी-आजोबांजवळ राहणाऱ्या या युवतीने मात्र आईच्या विरहातून हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे लॉकडाऊन काळात अनेक मानसिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठीचे सकारात्मक उपाय शोधण्याची गरज असल्याचे मानसिक तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सामाजिक, आर्थिक बदल होत आहेत. या परिस्थितीला सामोरे कसे जायचे ? हा प्रश्‍न पडतो. हाच भावनिक आवेग इतका जोरदार असतो की त्यातून स्वतःला संपवणे हा एकच पर्याय समोर दिसतो. लॉकडाऊनमुळे काहीजण आपल्या आप्तेष्टांपासून लांब राहत आहेत. या काळात त्यांच्या मानसिक आधाराची गरज त्यांना वाटते. लॉकडाऊनमुळे भेटण्याची इच्छा असली तरी परिस्थितीपुढे हतबल झालेले असतात. आजुबाजुला जवळच्या व्यक्ती असल्या तरी एकटेपणाचा अनुभव घेत आहेत. अशा वेळी मनातील भावना, ताण व्यक्त करायला हवा. ही परिस्थिती स्विकारून भावनिक, मानसिक सहनशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या परिस्थितीशी दोन हात करताना सकारात्मक बाजू तपासून घ्यायला हव्यात. 

लॉकडाऊन काळात आप्तेष्टांना भेटता येत नाही, ही भावना म्हणजे "सेप्रेशन ऍन्झायटी'सह नैराश्‍याला काही जण सामोरे जात आहेत. घरापासून लांब राहत असल्याने परकेपणाची भावना वाढीस लागते. आजुबाजुचे वातावरण नकारात्मक असताना सकारात्मक विचार करता येत नाहीत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ वाढविणे गरजेचे आहे. अपयश पचविण्याची ताकदही वाढविण्यासाठी प्रयत्न हवेत. गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी. 
- माहेश्‍वरी पुजारी, समुपदेशक, सीपीआर 


दृष्टिक्षेप  
- लॉकडाऊन काळात मानसिक प्रश्‍न निर्माण 
- परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे 
- सकारात्मक बाजू समजावून घ्यायला हवी 
- मनातील भावना, ताण व्यक्त करायला हवा 
- मानसिक सहनशक्ती वाढवणे गरजेचे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com