बेकिंग - कोल्हापुरात आज दुपारपर्यंतच कोरोनाचे द्विशतक पार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण त्याच्या निम्मे आहे. परिणामी बाधितांसाठी बेडची संख्या अपुरीच पडत आहे.

कोल्हापूर -  कोल्हापुरात कोरोनाचा कहर काही केल्या थांबता-थांबता थांबत नाही. गुरूवारी रात्री बारा वाजल्यापासून आज दुपारी तीन वाजेपर्यंत 198 कोरना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या  १९८ रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १३ हजार ५५७ वर पोहोचला आहे. 

दरम्यानल जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी रात्री बारा ते गुरुवारी रात्री बारा या कालावधीत ६३९ ने भर पडली होती तर काल दिवसभरात १२ बाधितांचे मृत्यू झाले, तर १७६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. आजवर पाच हजार १६६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. जिल्ह्यात एकूण सात हजार ८५७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. 
दिवसाला सरासरी ४०० ते ६०० बाधित आढळत आहेत.

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण त्याच्या निम्मे आहे. परिणामी बाधितांसाठी बेडची संख्या अपुरीच पडत आहे. अशात शाहूवाडी येथील पेरीड व अन्य एका शाळेत जादा बेड टाकून जवळपास दोनशे व्यक्तींवर उपचाराची व्यवस्था केली आहे. राधानगरीत आदमापूर येथे तसेच आजरा, गडहिंग्लज येथेही प्रत्येकी ५० ते १०० जादा खाटांची व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे डोंगरी तालुक्‍यातील सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांची व्यवस्था झाली आहे. गंभीर असलेल्या रुग्णांना सीपीआरमध्ये आणण्यात आले. 

हे पण वाचाकोरोनाच्या संकटातही स्वप्नांचा पाठलाग : कोल्हापूरातील धाडसी तरुणांचा प्रेरणादायी प्रवास 
  

ग्रामीण भागात घट
ग्रामीण भागातील बाधितांची संख्या घटली असली तरी दाटीवाटीच्या भागात पॉझिटिव्ह मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गेल्या चोवीस तासांत इचलकरंजीत १२०, कोल्हापुरात १९१, हातकणंगलेत ९६, करवीर ६३, तर शिरोळ तालुक्‍यात ३० बाधित आढळले आहेत.

  एकूण कोरोनाग्रस्त    १३ हजार ५५७
  एकूण कोरोनामुक्त    ५ हजार १६६ 
  एकूण मृत्यू     ३५४ 
  सध्या उपचार घेणारे    ७ हजार ८५७

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 198 corona positive patients in kolhapur