कोल्हापुरात आज 22 नवे कोरोनाबाधित रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

दिवसभरात एकूण चार गंभीर कोरोनाबाधितांवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत

कोल्हापूर - जिल्हाभरात गेल्या 24 तासात 22 नवीन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. तर 22 व्यक्‍ती कोरोना मुक्त झाल्या आहे. एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अशात शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 16 केंद्रावर गर्दी झाली. 

दिवसभरात एकूण चार गंभीर कोरोनाबाधितांवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर दिवसभरात एकूण 22 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. काही शाळातील शिक्षकांना कोरोना तपासणी करण्याचे आदेश आल्याने विविध कोवीड सेंटरवर शिक्षकांनी तपासणीसाठी गर्दी केली. यात सीपीआर रूग्णालय, कागल, गडहिंग्लजसह अन्य 16 कोवीड सेंटरवर कमीत कमी 2 हजाराहून अधिक व्यक्तींची तपासणी झाली. यात 1 हजार 985 व्यक्तींची ऍन्टीजेन तपासणी झाली. 131 व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल दोन दिवसात मिळणार आहेत. 

हे पण वाचाकोल्हापूर : इराणी खणीत तरुण बुडाला ; अग्निशामक दलाची शोधमोहीम

 एकूण कोरोना बाधित ः 48 हजार 814 

एकूण कोरोना मुक्त ः 46 हजार 547 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 670 
उपचार घेणारे ः 597 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 22 corona positive case in kolhapur