दहशतीचा नवा फंडा : चार-आठ जण जमायचे, गल्ली बोळात घुसायचे

new fanda Incidents in Daulat Nagar Yadav Nagar area Challenge before Rajarampuri Police
new fanda Incidents in Daulat Nagar Yadav Nagar area Challenge before Rajarampuri Police

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) :  चार-आठ जण जमायचे, गल्ली बोळात घुसायचे, ओरडा करत रस्त्यात लावलेल्या वाहनांची तोडफोड करायची, कोणी अडवा आला, तर त्याला ठोकायचे आणि भागात दहशत माजवायची. या दुखण्याचा त्रास दोन वर्षे राजारामपुरीवासीय सहन करत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी ही प्रवृत्ती मोडून काढण्याचे आव्हान आजही पोलिसांसमोर कायम आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विक्रमनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगरसारखा नेहमी चर्चेतील मोठा भाग येतो. दीड एक वर्षात दौलतनगर परिसरात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार अनेकदा घडले. यापूर्वी दोन गट वादातून आमने सामने आले. जमावाने दगडफेक करून वाहनांवर टार्गेट केले. त्या त्या वेळी दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी फाळकूटदादांवर कारवाई केली. कारवाई झाली की थोडे दिवस शांत बसायचे, पुन्हा डोकेवर काढण्याची येथील फाळकूटदादांची वृत्ती परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. 


यादवनगर परिसरातही सहा महिन्यांपूर्वी दोन गटांतील वादातून रस्त्यावरील रिक्षा, टेंपोची तोडफोड केली होती. दरम्यान, याच महिन्यात जाब विचारल्याच्या कारणावरून दोन रिक्षांसह मोटार, मोटारसायकलची तोडफोड केली. लग्नास नकार दिल्याच्या रागातून रिक्षासह दुचाकीची तोडफोड
केली होती. 


तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडे पोलिस ठाण्याची सूत्रे असताना गुन्हेगार, काळेधंदेवाल्यांसह फाळकूटदादांनीही हद्दीतून काढता पाय घेतला होता. एरवी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध (डीबी) पथक होते. भागातील फाळकूट दादांवर त्यांचा धाक तरी होता; पण सध्या हे डीबी पथकच बरखास्त केले आहे. त्याचा फायदा घेत फाळकूटदादांनी पुन्हा डोके वर काढले आहे. 

‘डीबी’ची पुनर्बांधणी करा...
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील डीबी (गुन्हे शोध) पथकाचे काम एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे सुरू आहे. दुसरीकडे नुकत्याच घडलेल्या लाचेच्या प्रकरणामुळे राजारामपुरी पोलिस ठाण्यातील डीबी पथकच बरखास्त केले आहे. त्याची पुनर्बांधणी करून हद्दीतील फाळकूटदादांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 


लॉकडाउन काळातील गुन्ह्यांचे स्वरूप
महिना    गर्दी  मारामारी    प्राणघातक हल्ले
मार्च               २५            १०
एप्रिल              १८            ०३
मे                    ५१           १५
जून                   ५२         ०८
जुलै                   २५        ०६
ऑगस्ट               १६        ०५

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com