कोल्हापुरात 'या' ठिकाणी नवे कोविड सेंटर आज पासुन सुरू

new Kovid Center at Mahasainik Hall in Kolhapur will start from today
new Kovid Center at Mahasainik Hall in Kolhapur will start from today

कोल्हापूर - शहरात आज पुन्हा नव्या १५३ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता २१०० वर गेला आहे. राजारामपुरी, कसबा बावडा, मंगळवार पेठ, यादवनगर हॉटस्पॉट बनली आहेत. दरम्यान, महासैनिक दरबार हॉल येथील कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. येथे ऑक्‍सिजनची व्यवस्था केल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. याशिवाय एक वैद्यकीय पथकही कार्यरत राहणार आहे.

शहरातील विविध भागांत आजची आणि रात्री पर्यंतची रुग्णसंख्या : 

राजारामपुरी १८(१८३), कसबा बावडा २(१२२), मंगळवार पेठ १६(१०६), शिवाजी पेठ ७( ७९), यादवनगर १( ६६), जवाहरनगर ३(६३), संभाजीनगर ७(५६),शाहूपुरी ३(६०), शनिवार पेठ २(५४), कदमवाडी २(५३)लक्षतीर्थ ६(५२), रंकाळा ४(४६), नागाळा पार्क २( ४५), उत्तरेश्‍वर पेठ ९(४४), मार्केट यार्ड ४(४३), रविवार पेठ १( ४३),फुलेवाडी १( ३६), सम्राटनगर ५(३३), शास्त्रीनगर १(३३), शुक्रवार पेठ ७(३३), विक्रमनगर ५(३३), रंकाळा टॉवर १(३०), राजेंद्रनगर २( २८), लक्ष्मीपुरी १( २३), आपटेनगर २(२१) रमणमळा ७(२०), रुईकर कॉलनी ५(२०), देवकर पाणंद २(१९), टाकाळा ३(१७), बिंदू चौक २(१६), जरगनगर १(१६), मोरे मानेनगर ७ (१६), सदर बाजार ३( १४), साळोखेनगर १( १४), गंगावेस ५( १३), दुधाळी १( १२), शिवाजी चौक १(११), सुभाषनगर २(८), अंबाई टॅंक १( ३).

३३ परिचारिकांची नियुक्ती

वैद्यकीय स्टाफवरील ताण कमी करण्यासाठी मध्यतंरी काही डॉक्‍टरांची नियुक्ती महापालिकेने केली आहेच. याशिवाय आता तातडीने ३३ नर्सची नियुक्ती केली. तीन महिने मुदतीवर मानधन तत्त्वावर या परिचारिका नेमल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

कंटेनमेंट झोन 

  •  ॲक्टिव्ह झोन : ८७
  •  बंद केलेले कंटेन्मेंट झोन: ९४
  •  एकूण कंटेन्मेंट झोन : १८१

होम आयसोलेशन 
(विविध रुग्णालयांच्या देखरेखीखाली उपचार)

  • सावित्रीबाई फुले          २४९
  • फिरंगाई हॉिस्पटल      १७९
  • राजारामपुरी               २०५
  • पंचगंगा हॉिस्पटल       ९०
  • कसबा बावडा             १४८
  • महाडिक माळ            १०६
  • आयसोलेशन             १४४
  • फुलेवाडी                   १६४
  • सदर बाजार               ११७
  • शनिवार पेठ              १९८
  • मोरे मानेनगर            १०५

          एकूण                       १७०५

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com