कोल्हापूर : सीपीआरमधील ऑक्सिजन टँक ठरतोय रुग्णांसाठी वरदान

oxygen tank cpr kolhapur health corona news
oxygen tank cpr kolhapur health corona news
Updated on

कोल्हापूर - कोरोना काळात गंभीर कोव्हीड रुग्णांसाठी सीपीआर रुग्णालयात जिल्हा प्रशासनाने २० हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसवला. या ऑक्सिजनच्या उपलब्धतेने हजारो रुग्णांना जीवनदान मिळाले. सध्या कोरोनाची तिव्रता कमी झाली आहे. तरी रुग्णालयातील इतर गंभीर आजारवर उपचार घेणाऱ्या नियमीत रुग्णांसाठी हा ऑक्सिजन टँक वरदान ठरतो आहे.

कोरोना महामारीत सुरवातीला सीपीआर रुग्णालयात ऑक्सिजनच्या गरजेचे पोटी धावाधाव झाली.कोव्हीड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी मोठ्या साठ्याची आवश्यकता होती.जिल्हा नियोजन समितीमधून मंजुरी देत हा टँक बसविण्यात आला.३० फूट उंच,२ मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक गेल्या सहा महिन्यांपासुन कार्यान्वित आहे.कोरोनाची संसर्गाची स्थिती आटोक्यात आली असली तरी भविष्यात अशा महामारीचा धोका आणि सी.पी.आर मधील आरोग्य यंत्रणेला बळ देण्यासाठी ही महत्वाचा ठरणार आहे.

अपघात विभाग,आय.सी.यु तसेच शस्त्रकिया विभागात ऑक्सिजनची तात्काळ गरज असते.आधी छोटे व जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवला जात होता.सिलेंडरची वाहतुकीला होणारा उशिर किंवा त्याची दर वेळी करावी लागणारी जोडणी यात वेळ जात असे त्यामुळे अनेकदा आपत्कालिन परिस्थिती निर्माण होत होती.परंतु नव्या मोठ्या टँकमुळे सी.पी.आर रुग्णालय ऑक्सिजनने परिपुर्ण झाले आहे.ऑक्सिजन टँक ते थेट रुग्णाच्या वार्ड पर्यंत जोडणी रुग्णांच्या फायद्याची तर सी.पी.आर आरोग्य यंत्रनेला मदतीची ठरणार आहे.

पुर्वीची स्थिती...

सी.पी.आर मध्ये रोज कमीत कमी 25 ते 60 ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा बाहेरुन होत होता.वाहनां मधुन वाहतूकीस वेळ लागत होता.दिवसाला 20 ते 40 रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती.सी.पी.आर रुग्णालयात ऑक्सिजन ची गरज अपुरी पडेल या भितीने अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल होत होती.या आधी अतीदक्षता विभागात फक्त ऑक्सिजनती सोय होती.

आताची स्थिती...

अधिक क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसवल्याने छोट्या सिलेंडरच्या वाहतुकीचा खर्च,श्रम तसेच वेळ वाचला आहे.एकाच ठिकाणावरुन या टँकला अद्ययावत करण्याची सोय उपलब्ध असल्याने ऑक्सिजन वहनाची प्रक्रीया सोप्पी झाली आहे.प्रत्येक वार्ड पर्यत ऑक्सिजनची पाईपलाईन पोहचल्याने प्रत्येक गरजू रुग्णास ही सोय उपलब्ध होऊ शकते.
 

  • 18  वार्ड मध्ये ऑक्सिजन जोडणी
  • 350 च्या जवळपास ऑक्सिजन पॉईंटस्
  • दिवसाला जवळपास 250 लिटर ऑक्सिजन खर्च होतो 
  • दर तीन तासाला ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती तपासली जाते
  • एकुण 6 टेक्निशिअलची नेमणुक
  • दिवसा 1 हजार रुग्ण कव्हर करण्याची क्षमता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com