नव्या मतदारांना मिळणार पीव्हीसी कार्ड 

सुनील पाटील 
Friday, 22 January 2021

नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांना ई-पिक (e-EPIC) उपलब्ध करून दिले जाणार आहे

कोल्हापूर : अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील आणि प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी केली जाणार आहे. सोमवारपासून (ता. 25) नोंदणीचे काम सुरु केले जाणार आहे. नव मतदारांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून पीव्हीसी मतदार ओळखपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी सांगितले. 

श्री कांबळे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांना ई-पिक (e-EPIC) उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा होतील. स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.

हे पण वाचा अजित दादांच्या मतावर सुप्रिया सुळेंची  प्रतिक्रिया वाचा सविस्तर  

मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या दिव्यांग मतदारांना गौरविण्यात येणार आहे. तसेच, ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आजअखेर एकूण 910 मतदारांनी सहभाग घेतला आहे. त्यांना ऑनलाईन प्रशस्तीपत्र दिले आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी"आम्ही आहोत.. सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक मतदार' हा विषय घेण्यात आला असल्याचेही श्री कांबळे यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new voting pvc voter id card