कोल्हापूर जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली ; राधानगरीतून 1100 क्युसेक विसर्ग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. राधानगरी,गगनबावडा,शाहूवाडी,पन्हाळा तालुक्यात घाटमाथ्यावर,तसेच धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने, जिल्ह्यातील नद्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 97.94 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा.च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1100 तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली तर भोगावती नदीवरील हळदी असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 35.61 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 74.051 इतका पाणीसाठा आहे.

वाचा - एकेकाळी वर्चस्व गाजविणारा महाराष्ट्राचा फुटबॉल संघ यंदाही आयलीगमध्ये नाहीच

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...

तुळशी 43.21 दलघमी, वारणा 451.70 दलघमी, दूधगंगा 332.52 दलघमी, कासारी 35.99 दलघमी, कडवी 28.05 दलघमी, कुंभी 37.80 दलघमी, पाटगाव 50.69  दलघमी, चिकोत्रा 17.42 दलघमी, चित्री 16.73 दलघमी, जंगमहट्टी 10.30 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 19.63 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी...

राजाराम 17.10 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 45.9 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31.9 फूट, नृसिंहवाडी 24.9 फूट, राजापूर 16 फूट तर नजीकच्या सांगली 8 फूट व अंकली 9.6 फूट अशी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine dams under water in Kolhapur district